शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सर, मला वाचवा, ‘सेक्सटॉर्शन’च्या भीतीपोटी तो ढसाढसा रडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 05:01 IST

फेसबुकवरील विशिष्ट ग्रुपला तो ज्वाॅईन झाला. त्यातून पुढे फेसबुक चॅटिंग झाली. व्हॉट्सॲप क्रमांक शेअर झालेत. दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कॉलिंग झाले. अन् तो त्या क्षणिक सुखाला भुलला. तिसऱ्याच दिवशी त्याला त्याचाच न्युड व्हिडीओ युट्युब व अन्य समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी मिळाली. मग काय सामािजक बदनामीच्या भीतीपोटी ‘सेक्सटॉर्शन’पूर्वी त्याने सायबर पोलीस ठाणे गाठले. त्याला बदनामीच्या भीतीने ग्रासले होते. सर, मला वाचवा, म्हणत तो अक्षरश: ढसाढसा धायमोकलून रडला. 

 प्रदीप भाकरेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : फेसबुकवरील विशिष्ट ग्रुपला तो ज्वाॅईन झाला. त्यातून पुढे फेसबुक चॅटिंग झाली. व्हॉट्सॲप क्रमांक शेअर झालेत. दुसऱ्या दिवशी व्हिडिओ कॉलिंग झाले. अन् तो त्या क्षणिक सुखाला भुलला. तिसऱ्याच दिवशी त्याला त्याचाच न्युड व्हिडीओ युट्युब व अन्य समाजमाध्यमांवर व्हायरल करण्याची धमकी मिळाली. मग काय सामािजक बदनामीच्या भीतीपोटी ‘सेक्सटॉर्शन’पूर्वी त्याने सायबर पोलीस ठाणे गाठले. त्याला बदनामीच्या भीतीने ग्रासले होते. सर, मला वाचवा, म्हणत तो अक्षरश: ढसाढसा धायमोकलून रडला. शहरातील एक उच्चशिक्षित असा तिशीच्या आतबाहेरचा एक युवक शुक्रवारी दुपारी १२ च्या सुमारास शहर आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाण्यात पोहोचला. सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र सहारे यांच्याकडे तो व्यक्त झाला. मात्र त्याचे रडणे थांबेना. तो का रडतो आहे, हे पाहण्यासाठी कर्मचारी देखील जमा झाले. अखेर त्या सेक्सटॉर्शनच्या प्रकारातून बाहेर पडण्याचा मार्ग व समुपदेशन केल्यानंतर तो शांत झाला. याबाबत तक्रार दाखल करून घेण्यात आली. 

न्युड कॉल्सच्या माध्यमातून फसवणूक - फेसबुक, व्हॉट्सॲपवर व्हीडिओ कॉलवरून अनोळखी व्यक्तीचा फोन आला, तर तो स्वीकारू नका. व्हिडिओ कॉलवर बोलल्यानंतर वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून दोन्हीकडील व्यक्तींना नग्न असल्याचे भासवून हा व्हीडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जात आहेत. चित्रपट कलावांतापासून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत अनेकांना ‘न्यूड कॉल्स’च्या माध्यमातून फसवणूक अर्थात सेक्सटार्शन करण्याचा प्रकार सुरू आहे. त्याच धर्तीवरील हा प्रकार शहरात उघड झाला. त्यात सेक्सटार्शन होण्याच्या भीतीपोटी त्याने सायबर पोलीस ठाणे गाठले.- एखादी व्यक्ती एखाद्या पॉर्न साइट, डेटिंग साइट किंवा सुरक्षित नसलेल्या साइटला भेट देत असल्यास, हॅकर्स सॉफ्टवेअरद्वारे आपल्या सर्फिंग तपशीलांचा बॅकअप तयार करतात. यानंतर त्यांना त्या साइटवर भेट देणाऱ्या व्यक्तीचा नंबर, ईमेल आयडी आणि सोशल मीडिया अकाउंट सापडतो. 

सेक्सटॉर्शन गेम‘सेक्सटॉर्शन’ म्हणजे व्यक्तीचा वैयक्तिक डेटा चोरून ब्लॅकमेल करणे आणि खंडणी मागणे. सुंदर मुलीच्या नावाने सोशल मीडियाचे फेक प्रोफाइल तयार केले जाते. फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली जाते किंंवा  व्हाट्सॲपवर ‘मॅसेज पाठवला जातो. जेव्हा समोरची व्यक्ती ते प्रोफाइल पाहिल्यानंतर विनंती स्वीकारते. आणि काही दिवसात ते नग्न छायाचित्रे आणि व्हिडिओ एक्सचेंज करतात. ते या सर्व चॅट्स आणि व्हिडिओ सामग्रीची नोंद ठेवली जाते आणि नंतर त्याच्या मदतीने ब्लॅकमेल केले जाते. 

 

टॅग्स :Facebookफेसबुकcyber crimeसायबर क्राइम