शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

‘रंगीला सरडा’ पडला प्रेमात....!, ‘फॅन थ्रोटेड लीझर्ड’ या नव्या प्रजातीची नोंद

By गणेश वासनिक | Updated: May 7, 2023 18:22 IST

मध्य महाराष्ट्रात दुर्मिळ सरड्याचे दर्शन, अमरावती येथील वन्यजीव प्रेमींच्या कॅमेऱ्यात कैद

अमरावती : माळराने, शेतीचा परिसर व विरळ मनुष्यवस्ती लगतच्या जंगलात आढळणारा ‘रंगीला सरडा’ सध्या प्रेमात पडला आहे. या सरड्याचे दर्शन नुकतेच अमरावती परिसरातील जंगलात वन्यजीव छायाचित्रकार डॉ. तुषार अंबाडकर, विनय बढे, अमित सोनटक्के आणि वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील यांना झाले आहे. पालीच्या आकाराचा या सरड्याला इंग्रजीमध्ये ‘फॅन थ्रोटेड लीझर्ड’ असे म्हणतात. 

सरडा डेक्कननेनिंस या शास्त्रीय नावाने हा सरडा ओळखला जातो. विणीच्या काळात नर सरड्याचा गळ्याखालचा भाग रंगीत होतो. मादीला आकर्षित करण्यासाठी हा सरडा स्वतःच्या गळ्याखालील पोळे मागे पुढे करून आकर्षित करतो. मादीला मात्र असे रंगीत गळ्याखालील पोळे नसतात, हे विशेष. 

पुणे, नाशिक, अहमदनगर व जालना वगळता उर्वरित महाराष्ट्रात याचे दर्शन दुर्मिळ आहे. या सरड्याला ‘निलपंखी सरडा’ नावानेही ओळखले जाते. या सरड्याची लांबी २२ ते २३ सेमी पर्यंत असून आकाराने हा सरडा आकारणे लहान असून लहान कीटक याचे मुख्य खाद्य आहे. या प्रजाती बद्दलचे वर्णन पहिल्यांदा शास्त्रज्ञ जॉर्डन यांनी ई.स. १८७० मध्ये केले आहे. हा सरडा भारतासाठी स्थानविशिष्ट प्रजाती म्हणून जगप्रसिद्ध आहे. या सरड्याचे पृथ्वीवर अस्तित्व २६ लाख वर्षापूर्वी असल्याची नोंद आहे. अमरावती परिसरात या सरड्याच्या दर्शनाने येथील जैवविविधेतेचे महत्व पुन्हा नव्याने अधोरेखित झाल्याचे जाणकारांचे मत आहे. जागतिक स्तरावर निलपंखी सरड्यावर संशोधनजगप्रसिद्ध सरीसृप तज्ञ डॉ. वरद गिरी, डॉ. दीपक वीरप्पन, मोहम्मद असिफ काझी व के. प्रवीण कारंथ यांच्या संशोधनादरम्यान त्यांना हा सरडा पुणे, नाशिक, अहमदनगर व जालना वगळता उर्वरित महाराष्ट्रात आलेला नव्हता. त्यांनी संपूर्ण भारतभर तब्बल तीन हजार सहाशे किमी फिरून यावर संशोधन केले आहे. या सरड्याच्या तब्बल पाच नवीन प्रजाती त्यांनी शोधून काढल्या आहेत, या पाचही प्रजाती जगासाठी नवीन ठरलेल्या आहेत.  या सरड्याचे दर्शन चकित करणारे आहे. ही नोंद महत्त्वपूर्ण असून या नोंदीसह आजवर अनेक दुर्मिळ प्रजातींचे दर्शन आपल्या भागात झाले आहे. या अनुषंगाने विदर्भातील भूस्थित परिसंस्था व कृषी परिसंस्थाचे संवर्धन होणे गरजेचे वाटते. - यादव तरटे पाटील,​​​ वन्यजीव अभ्यासक, अमरावती या सरड्याचे दर्शन मनाला आनंद देणारे आहे. आम्ही देशी- विदेशी पक्षी छायाचित्रे व वन्यप्राणी टिपण्यासाठी नियमित जात असतो. या सरड्याचे दर्शन आम्हाला प्रेरणा देणारे आहे. - डॉ. तुषार अंबाडकर, वन्यजीव छायाचित्रकार, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती