शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
3
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
4
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
5
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
6
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
7
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
8
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
9
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
10
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
11
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
12
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
13
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
14
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
15
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
16
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
17
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
18
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
19
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
20
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी

व्यावसायिकांनी गिळले फुटपाथ

By admin | Updated: April 28, 2016 00:08 IST

अमरावती शहरात महानगरपालिकेने कोटयवधी रूपये खर्चुन पादचाऱ्यांसाठी फुटपाथ तयार केले आहेत.

पंचवटी चौकात हॉटेल मालकाची मनमानी : गाडगेनगर-कठोरा मार्गावर हातगाड्यांचे साम्राज्यअमरावती : अमरावती शहरात महानगरपालिकेने कोटयवधी रूपये खर्चुन पादचाऱ्यांसाठी फुटपाथ तयार केले आहेत. मात्र, अनेक व्यवसायिकांनी स्वत:ची खासगी मालमत्ता समजून या फुटपाथवरच दुकान थाटली आहेत. स्थानिक पंचवटी चौकातील रोशनी हॉटेल हे व्यापाऱ्यांच्या बेमुर्वतखोरधोरणाचे उत्तम उदाहरण म्हणून सांगता येईल. या हॉटेलच्या बाहेर फुटपाथवर अतिक्रमण करून खुलेआम व्यवसाय केला जात आहे. हा प्रकार नियमबाह्य असून सुध्दा काम करताना महानगरपालिकेचे अधिकारी काय करतात?, असा प्रश्न विचारला जात आहे. रोशनी हॉटेलनजीक एक पानटपरी आहे. तिने सुध्दा फुटपाथ व्यापलेला आहे. या फुटपाथवर चक्क हॉटेल्समधील टेबल ठेवले जातात आणि याचठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था देखील केली जाते.हॉटेलमध्ये नाश्ता, चहा पिण्यासाठी येणारे ग्राहक हॉटेलसमोर बेशिस्त पध्दतीने वाहने ठेवतात. त्यामुळे फुटपाथवर चालणे देखील कठीण होऊन जाते. अमरावती, नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने येथे नेहमी मोठी वर्दळ असते. यामुळे वाहनांना अडथळा निर्माण होतो. याठिकाणी खरे तर वाहतूक पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित आहे. परंतु तसे होताना दिसत नाही. सदर हॉटेल चालक दिवसाला हजारो रूपयांची कमाई करीत असल्याने ग्राहकांसाठी त्यांनी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करायला हवी. या हॉटेलच्या बाजूलाच मंगल कार्यालय आहे. त्यामुळे येथे नागरिकांची मोठी वर्दळ असते. परंतु चालण्यासाठी फुटपाथच नसल्याने पादचाऱ्यांची गळचेपी होत आहे. इतकेच नव्हे तर गाडगेनगर ते कठोरा मार्गावर सर्वदूर अशीच स्थिती आहे. फळे, भाज्या विक्रेत्यांनी हे फुटपाथ गडप केले आहेत. या फुटपाथवर वाहन उभे करण्यासही लोकांना हे दुकानदार मज्जाव करतात. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न या मार्गावर नेहमीच ऐरणीवर असतो. फुटपाथ हे स्वत:च्या मालकीचेच असल्याच्या अविर्भावात हातगाडीधारक येथे गाड्या उभ्या करतात. महापालिका अधिकारी व वाहतूक पोलिसांनी वाहतूक समस्या सोडविण्यासाठी या हातगाडी धारकांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.