शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
2
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
4
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
5
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
6
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
7
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
8
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
9
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
10
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
11
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
12
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
13
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
14
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
15
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
16
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
17
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
18
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
19
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
20
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर

भोंदूबाबा पवन महाराजच्या आलमारीत ‘तंत्रसिद्धी रहस्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 23:05 IST

भोंदूबाबा पवन महाराजच्या घरातील आलमारीत पोलिसांना 'तंत्रसिद्धी रहस्य भाग ५' नावाचे पुस्तक सापडले आहे. या पुस्तकात अंधश्रद्धेविषयीचे अनेक पैलू ठासून भरले आहेत. ते पुस्तक पोलिसांनी जप्त केले .

ठळक मुद्देकुलूप उघडले : गाडगेनगर पोलीस पथक मुंबईला जाणार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : भोंदूबाबा पवन महाराजच्या घरातील आलमारीत पोलिसांना 'तंत्रसिद्धी रहस्य भाग ५' नावाचे पुस्तक सापडले आहे. या पुस्तकात अंधश्रद्धेविषयीचे अनेक पैलू ठासून भरले आहेत. ते पुस्तक पोलिसांनी जप्त केले .गाडगेनगर पोलिसांनी शनिवारी उशिरा रात्री भोंदू पवन महाराजच्या घराची पुन्हा झडती घेतली. बनावट चावीने त्याची आलमारी उघडली. त्यात 'तंत्रसिद्धी रहस्य भाग - ५' या पुस्तकासह पूजा-अर्चनेचे साहित्य, चिल्लर पैसे, महागड्या साड्या आढळून आल्या. हे तंत्रमंत्रांनी भरलेले पुस्तक राजस्थानच्या अजमेरस्थित मदनगंज किसनगंज येथील मयुरेश प्रकाशनचे आहे. त्याचे लेखक पंडित रमेशचंद्र शर्मा असून पुस्तकाच्या मुखपृष्ठावर महाकालीचे छायाचित्र आहे. ते पुस्तक ४१६ पानांचे आहे. या पुस्तकात सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त करण्याचे मंत्र, कुणाला कसे वश करायचे, त्यासाठी वशीकरण मंत्र, गनिमाला आपलेसे करण्याचे मंत्र, दुसऱ्यांच्या मनातील भावना किंवा अन्य ठिकाणी काय सुरु आहे, हे ओळखण्यासाठी कर्णपिशाच मंत्र, काळी विद्या, पंचांगातील आराखडा आदी तंत्रमंत्र लिखित आहेत. याशिवाय बांगला देशात काळ्या विद्येचा जादूटोणा चालतो, त्यातील तंत्रमंत्र सुद्धा पुस्तकात दिलेले आहेत. हे पुस्तक भोंदू पवन महाराजने उत्तर प्रदेशातून आणल्याचे सांगण्यात येत आहे. हे पुस्तक वाचूनच तो नागरिकांना जाळ्यात अडकवित होता. या भोंदूने पुस्तकातील बहुतांश तंत्रमंत्र विद्येचा अभ्यास केला. त्याचा उपयोग करून त्याने भक्तांमध्ये अंधश्रद्धा पसरविली, असे निरिक्षण गाडगेनगर पोलिसांनी नोंदविले आहे.आई-वडिलांची न्यायालयीन कोठडीत रवानगीभोंदूबाबा पवनच्या आई-वडिलांची कोठडीत चौकशी केल्यानंतर त्यांना गाडगेनगर पोलिसांनी रविवारी पुन्हा न्यायालयात हजर केले. आणखी चौकशी करण्यासाठी पुन्हा पोलीस कोठडीची मागणी केली मात्र न्यायालयाने दोघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. भोंदू पवन अद्याप पोलिसांच्या हाती लागला नाही. त्याने मुंबईतील एखाद्या भक्ताकडे आश्रय घेतल्याची शंका पोलिसांनी वर्तविली.आलमारीत दीडशेवर महागड्या साड्याभोंदूबाबा पवनच्या डबलडेकर आलमारीत पोलिसांना दीडशेवर महागड्या साड्या आढळल्या. पवनच्या अंगात देवीचा कथित संचार झाल्यानंतर अनेक महिला-पुरुष त्याचेसमोर नतमस्तक व्हायचे. महिला ओटी भरायच्या. लब्धप्रतिष्ठित महिला पवनच्या भक्त असल्याने त्याला महागड्या साड्या अर्पण करायच्या. शालू, पैठणी, भरजरी साड्यंचा अहेरच पवनला मिळत होता. मात्र, आमचा साडी विक्रीचा व्यवसाय असल्याची बतावणी पवनची आई करीत आहे.भोंदू पवन महाराजच्या घरातील आलमारीतून 'तंत्रसिद्धी रहस्य भाग ५' नावाचे पुस्तक जप्त करण्यात आले आहे. पवन महाराज पसार असून त्याचा कसून शोध सुरूच आहे.- मनीष ठाकरे,पोलीस निरीक्षक, गाडगेनगर.