शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
हसतं घर उद्ध्वस्त! हळदीच्या दिवशी नाचताना नवरी बेशुद्ध अन्...; वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
6
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
7
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
8
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
9
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
10
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
11
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
12
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
13
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
14
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
15
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

जिल्हा सामान्य रुग्णालयच आजारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 05:01 IST

बाह्यरुण विभागात रुग्णावर उपचारासाठीची वेळ सकाळी ८ ते २ असली तरी नियमित डाॅक्टर व स्टाफ गैरहजर असल्याची बाब नित्याचीच झाली आहे. आकस्मिक वाॅर्डात एकच डाॅक्टर कर्तव्यावर असल्याने कामाचा ताण वाढत आहे. मनुष्यबळ तोकडे असल्याचा प्रस्ताव पाठवूनही वरिष्ठांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढीव दिली जात नाही. २७५ बेड व ५ आयसीयू बेड हे तुटपुंजे असल्याने एका बेडवर दोन ते तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शहरातील अस्वच्छता, वातावरणातील बदल व सततचा पडणारा पाऊस यांमुळे सर्दी, खोकला तापाचे रुग्ण वाढले आहेत. यामध्ये लहान मुलांना व्हायरल तापाची लक्षणे दिसून येत आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णांमुळे इर्विन रुग्णालयात आजारी पडल्याचे चित्र आहे. रुग्ण अधिक आणि खाटा कमी अशी विदारक स्थिती आहे. रुग्णसंख्या वाढल्याने आरोग्य यंत्रणेवर ताण येत आहे.बाह्यरुण विभागात रुग्णावर उपचारासाठीची वेळ सकाळी ८ ते २ असली तरी नियमित डाॅक्टर व स्टाफ गैरहजर असल्याची बाब नित्याचीच झाली आहे. आकस्मिक वाॅर्डात एकच डाॅक्टर कर्तव्यावर असल्याने कामाचा ताण वाढत आहे. मनुष्यबळ तोकडे असल्याचा प्रस्ताव पाठवूनही वरिष्ठांकडून अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्या वाढीव दिली जात नाही. २७५ बेड व ५ आयसीयू बेड हे तुटपुंजे असल्याने एका बेडवर दोन ते तीन रुग्णांवर उपचार सुरू आहेत. उपजिल्हा रुग्णालयात तुटपुंज्या सोई असल्याने नाइलाजास्तव बाहेरच्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ यावे लागत आहे. मायक्रो सोनोग्राफी, एमआरआय मशीन उपलब्ध नाही. 

डॉक्टरांचा अनुशेष केव्हा भरणार?रुग्णालयात सेवा देण्यासाठी फक्त ८६ नर्सेस आहेत. डाॅक्टरांची संख्या तोकडी आहे. वाॅर्डातील स्वच्छतागृहांची नियमित सफाई होत नसल्याने प्रत्येक वाॅर्डात अस्वच्छता पसरली आहे. आरएमओ डॉ. प्रमोद निरवणे यांच्याशी या विषयावर सविस्तर चर्चा त्यांनी केली. शासनाने त्वरित स्टाफ उपलब्ध करून देण्याची मागणी त्यांनी केली.

वंचित बहुजन आघाडीची धडकईर्विनमध्ये बेडअभावी रुग्णांची फरफट होत असल्याच्या पार्श्वभूमीवर रविवारी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी धडक दिली. डॉक्टर, कर्मचारी अनुपस्थित असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. महासचिव किरण गुडधे, सुरेश तायडे यांनी प्रत्यक्ष वाॅर्डा-वाॅर्डात जाऊन रुग्णांची विचारपूस केली, सोई-सुविधांबद्दल माहिती जाणून घेतली.

 

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल