शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत श्री अंबादेवी संगीत सेवा समारोह २९ पासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:12 IST

श्री अंबादेवी संगीत सेवा समारोह २०१९ यंदा २९ नोव्हेंबरपासून आयोजित करण्यात आला आहे. यंदा पंधराव्या वर्षानिमित्त विख्यात आंतरराष्ट्रीय कलाकारांना आमंत्रित केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बहुप्रतीक्षित श्री अंबादेवी संगीत सेवा समारोह २०१९ यंदा २९ नोव्हेंबरपासून आयोजित करण्यात आला आहे. यंदा पंधराव्या वर्षानिमित्त विख्यात आंतरराष्ट्रीय कलाकारांना आमंत्रित केले आहे.यंदाच्या महोत्सवात २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता शोभा चौधरी (इंदौर) या गायन सादर करतील. त्याच दिवशी रात्री ८ वाजता बनारस घराण्याचे विख्यात गायक पद्मभूषण पं. राजन व पं. साजन मिश्रा आपले गायन सादर करतील. त्यांना तबलासंगत पं. संदेश पोपटकर व संवादिनी संगत श्रीकांत पिसे (रा. नागपूर) हे करणार आहेत. ३० नोव्हेंबरला सायंकाळी ६ वाजता मुंबई येथील जुई धायगुडे-पांडे यांचे गायन होईल. त्याच दिवशी रात्री ८ वाजता जयपूर येथील उस्ताद नफीसुद्दीन व उस्ताद अनिसुद्दीन हे डागर बंधू धृपद धमार गायन सादर करतील. विशेष आयोजनात १ डिसेंबर १९ रोजी सकाळी १० वाजता पं. जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य ‘कट्यार’फेम महेश काळे हे गायन सादर करतील, तर सायंकाळी ६ वाजता पद्मभूषण पं. विश्वमोहन भट्ट (जयपूर) व संतुरवादक तरूण भट्टाचार्य (कोलकाता) यांची मोहनवीणा व संतूर यांची जुगलबंदी होईल. त्यांना सुब्रतो भट्टाचार्य (कोलकाता) हे तबलासंगत करतील. त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता समारोपीय सत्रात धारवाड येथील पद्मश्री पं. वेंकटेशकुमार यांचे गायन सादर होईल.श्री अंबादेवी कीर्तन सभागृहात होणाऱ्या या नि:शुल्क कार्यक्रमाचा लाभ रसिकांनी घ्यावा, असे आवाहन श्री अंबादेवी संस्थान विश्वस्त मंडळाने मंगळवारी घेतलेल्या पत्रपरिषदेत केले.

टॅग्स :cultureसांस्कृतिक