शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

श्री अंबादेवी संस्थानचा कारभार अपारदर्शक

By admin | Updated: July 11, 2017 00:02 IST

अंबानगरीतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबादेवी संस्थानच्या कारभारात पारदर्शकता नसून ...

धर्मदाय सहआयुक्तांचा ठपका : नोटीस बजावली, १३ जुलैपर्यंत द्यावे लागणार स्पष्टीकरण वैभव बाबरेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अंबानगरीतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री अंबादेवी संस्थानच्या कारभारात पारदर्शकता नसून संस्थानच्या कामकाजात अनेक त्रुटी, उणिवा असल्याचा ठपका ९ दिवसांच्या निरीक्षणाअंती धर्मदाय सहआयुक्तांनी ठेवला आहे. धर्मदाय सहआयुक्तांच्या आदेशान्वये संस्थानच्या विश्वस्तांना १३ जुलैपर्यंत यासंदर्भात खुलासा सादर करावा लागणार आहे. निरीक्षणादरम्यान संस्थानच्या कारभारात तब्बल ६४ त्रुटी आढळल्या असून त्यापैकी ९ गंभीर त्रुटींवर धर्मदाय सहआयुक्तांनी बोट ठेवले आहे. श्री अंबादेवी संस्थानचे पक्षपाती धोरण आणि येथील अनियमिततेसंदर्भात ‘लोेकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्तांच्या आधारे धर्मदाय सहआयुक्तांनी ही कारवाई केली, हे विशेष. श्री अंबा-एकवीरा देवी म्हणजे केवळ वैदर्भियांचेच नव्हे तर राज्यातील हजारो भक्तांचे श्रद्धास्थान. वर्षातून देवीचे दोन नवरात्रौत्सव उत्साहात साजरे केले जातात. चैत्र आणि अश्विन नवरात्रौत्सवात येथे राज्यभरातून भक्तांची गर्दी उसळते. वर्षभर येथे भक्तांचा राबता असतो. संस्थानचे उत्पन्न देखील भरपूर आहे. मात्र, दानपेटीत महिन्याकाठी गोळा होेणाऱ्या जवळपास लाखभराच्या रकमेचा विनियोग नेमका कुठे केला जातोे, याबाबत काही भक्तांनी असंतोष व्यक्त केला आहे. शिवाय संस्थानच्या विश्वस्तांकडून नवरात्रौत्सवादरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या महाप्रसादातही ‘पंक्तीप्रपंच’ केला जात असल्याचे ‘लोकमत’ने एका वृत्तातून प्रसिद्ध केले होते. त्यानंतर अंबादेवी मंदिरातील अंगारापात्रात चक्क मृत पाल आढळल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमतम’ध्ये प्रकाशित झाले. धर्मदाय सहआयुक्तांनी श्री अंबादेवी संस्थानचे २० मे रोजी निरीक्षण केले. निरीक्षकांनी ११ ते २० मे दरम्यान केलेल्या निरीक्षणात तब्बल ६४ त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यापैकी अतिगंभीर त्रुटी, उणिवांसंदर्भात धर्मदाय सहआयुक्तांनी संस्थानला १७ जून रोजी नोटीस बजावली आहे. यानुसार १३ जुलैपर्यंत संस्थानला त्रुटी, उणिवांबाबत सप्रमाण स्पष्टीकरण द्यायचे आहे. दिलेल्या मुदतीत खुलासा सादर न केल्यास अथवा खुलासा समाधानकारक न आढळल्यास हे प्रकरण धर्मदाय सहआयुक्तांकडे महाराष्ट्र मुंबई विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ४१ डी, ८३, ३९ अंतर्गत कारवाईकरिता दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. धर्मदाय सहआयुक्त ए.एस.राजन्देकर यांच्या मार्गदर्शनात धर्मदाय उपायुक्त आर.जी.मामू, निरीक्षक आर.एस.गुल्हाने, एस.आर. राऊत, छाया तिवारी यांनी संस्थानबद्दल निरीक्षण नोंदविले. धार्मिक संस्थानांना पारदर्शक राहण्याचे आवाहनश्री अंबादेवी संस्थानला बजावलेल्या नोटीशीच्या पार्श्वभूमिवर धर्मदाय सहआयुक्त ए.एस.राजन्देकर यांनी इतर धार्मिक संस्थानांना पारदर्शकत्व जपण्याचे आवाहन केले आहे. धार्मिक संस्थानांनी सर्व दस्तऐवज अद्ययावत ठेवून सर्व व्यवहारांचा लेखाजोखा तयार ठेवावा, असे राजन्देकरांनी सुचविले आहे. निरीक्षणादरम्यान आढळलेल्या त्रुटीसंस्थानच्या मालकीची ४५० एकर जमीन आहे. मात्र, या जमिनीचे रेकॉर्ड व खर्चाचा ताळमेळ योग्य पद्धतीने ठेवलेला नाही. अकृषक शेतीच्या विनियोगाचे नियोजन नाही. शासकीय प्रकल्पात गेलेल्या जमिनीचा कोणताही लेखाजोखा उपलब्ध नाही. श्री अंबादेवीला दान म्हणून प्राप्त होणारे चांदी-सोन्याचे अलंकार, वस्तू यांच्या गलाईचा व विक्रीचा कोणताही हिशेब नाही.संस्थानने घेतलेल्या कर्जाची पूर्वपरवानगी धर्मदाय सहआयुक्तांकडून न घेता कर्जाची उचल केली गेली.संस्थानच्या बँकेतील जमा ठेवी या कार्यालयाच्या रेकॉर्डवर घेतलेल्या नाहीत.कर्जाचा उल्लेख हिशेबपत्रकाच्या जमेच्या बाजूला दाखविलेला नाही.टीडीएस, आयकर भरण्यास विलंब केल्याने संस्थानला दंड भरावा लागला. संस्थानच्या लेजर अकाऊंटमधील बांधकाम दानपेटीचा हिशेब आमदनीतील बांधकाम दानपेटीशी जुळून येत नाही. मंदिराच्या बांधकामासाठी प्राप्त निधी इतर बांधकामाकरिता वापरण्यात आला. भक्तांमध्ये तीव्र असंतोषपंचक्रोशीतील भक्तांची श्री अंबादेवीवर अपरिमित श्रद्धा आहे. त्यामुळे यामंदिरात सतत भक्तांची मांदियाळी असते. सश्रद्ध नागरिक मंदिराच्या दानपेटीत मोठी रक्कम टाकतात. मंदिराच्या तसेच संस्थानच्या विकासासाठी या रकमेचा विनियोग व्हावा, अशी स्वाभाविकपणेच भक्तांची अपेक्षा असते. मात्र, रकमेचा विनियोग संस्थानद्वारे पारदर्शकरित्या केला जात नसल्याचा आरोप यापूर्वी अनेकदा भक्तांनी केला आहे. पाणी, महिलांसाठी प्रसाधनगृह आदी क्षुल्लक सोयी देखील संस्थानने केल्या नसल्याने हा पैसा जातो कुठे, असा सवाल भक्तांनी उपस्थित केला असून तसे निरीक्षण निरीक्षकांनी नोंदविले आहे. धर्मदाय सहआयुक्त कार्यालयातर्फे नियमित तपासणी करण्यात आली. त्यामध्ये गंभीर त्रुटी नाहीत. त्यांच्या नोटीसवर संस्थानतर्फे उत्तरे देण्यात येईल. संस्थानचे कामकाज हे पारदर्शक आहे. अतुल आळशी, सचिव, अंबादेवी संस्थानधर्मदाय सहआयुक्त कार्यालयामार्फत नोटीस मिळाली आहे. मात्र, अंबादेवी संस्थानचे कामकाज पारदर्शक असून नोटीसद्वारे उपस्थित केलेल्या मुद्यांचे स्पष्टीकरण देऊ. - सूर्यकांत कोल्हे, व्यवस्थापक, अंबादेवी संस्थान