शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

बहारों फूल बरसाओ...

By admin | Updated: May 31, 2015 00:12 IST

'बहारों फूल बरसाओ, मेरा मेहबूब आया है' हे सदाबहार गीत अर्ध शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे.

अर्धशतकाच्या उंबरठ्यावर : लग्नसराईतील सदाबहार गीताची ‘नजाकत’अमरावती : 'बहारों फूल बरसाओ, मेरा मेहबूब आया है' हे सदाबहार गीत अर्ध शतकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. आजही हे गीत सुरू झाल्याशिवाय नवरदेव-नवरी लग्नमंडपात येत नाही. गाणे वाजू लागले की, प्रत्येकाला आपल्या लग्नातील अविस्मरणीय क्षण आठवल्याशिवाय राहत नाही. लाखो-करोडो रुपये खर्च केले तरीही या गाण्याशिवाय लग्नसोहळा अपूर्णच. एवढी प्रचंड लोकप्रियता या गाण्याला मिळाली आहे. याच एका गाण्याने ब्रास बँड पथकांना लाखो रुपयांची ओवाळणी मिळवून दिली आहे.भांगडा, मुंगळा, लुंगी, नागीण, अशा विविधढंगी गाण्यांवर नृत्य करीत वरात येते. मंडपात जमलेले शेकडो-वऱ्हाडी वराची प्रतीक्षा करीत असतात. बँड पथकातील मास्टर क्लेरिनेटवर 'बहारों फूल बरसाओ, मेरा मेहबूब आया है' हे गीत वाजविणे सुरू करतात व त्यांच्या पाठीमागे चालत नवरदेव व लग्नमंडपात येतो. त्यानंतर त्याच्यावर पुष्पवर्षाव होतो. त्यानंतर सुरू होतात मंगलाष्टक. हे दृश्य आपण प्रत्येक लग्नात पाहत असतो. गेल्या ४९ वर्षांपासून हे गीत लग्नसराईत वाजविले जात आहे. सदाबहार, हमेशा जवांदिल या गीताने प्रत्येकाच्या हृदयात जागा करून ठेवली आहे. या गीताला लोकप्रिय ठरविण्याचे काम ब्रास बँड पथकाने केले आहे. हिंदी चित्रपटसृष्टीने सदाबहार गीत देऊन मानवी जीवनाला समृध्द केले आहे. त्यातील एक चित्रपट 'सूरज' जो मार्च १९६६ मध्ये रुपेरी पडद्यावर झळकला होता. या चित्रपटातील 'बहारों फूल बरसाओ' हे गीत अभिनेता राजेंद्रकुमार व अभिनेत्री वैजंयतीमाला यांच्यावर चित्रीत झाले आहे. या गाण्याने अनेक विक्रम केलेत. त्यातील एक विक्रम म्हणजे गेल्या ४९ वर्षांपासून हे गीत प्रत्येक लग्नात वाजविले जात आहे. या गाण्याशिवाय लग्न लागतच नाही. गीत हसरत जयपुरी यांनी लिहिले व संगीत शंकर-जयकिशन यांनी दिले. महागायक मोहम्मद रफी यांनी हे गीत गाऊन अजरामर केले. गाण्याला लोकप्रिय केले ते बँड पथकातील कलाकारांनी. जिल्ह्यात हजारो बँड पथक आहेत. मात्र, त्यातील बोटावर मोजण्याइतके बँड पथक स्वातंत्र्यपूर्व काळापासून टिकून आहेत. १९६६ साली 'सूरज' हा हिंदी चित्रपट रुपेरी पडद्यावर झळकला आणि त्याच वर्षापासून लग्नसराईत 'बहारों फूल बरसाओ' हे गीत बँड पथक वाजवू लागले. वरात आल्यानंतर नवरदेवाला लग्नमंडपापर्यंत पोहोचवेपर्यंत' क्लेरिनेट'वर हे गाणे वाजविण्यात येते. ही प्रथाच आजतागायत सुरू आहे. या गाण्यावर वऱ्हाडी हजारो रुपयांची ओवाळणी देत असल्याने बँड पथकातील कलाकारही खुश होऊन तल्लीनतेने हे गीत वाजवत आहेत. हे गीत बँड पथकातील 'मास्टर'च्या हाती क्लेरिनेट असते. तेच हे गीत सादर करतात. अशा विविध बँड पथकातील काही ज्येष्ठ व नवीन मास्टर यांच्या प्रतिक्रियाही त्या गाण्याएवढयाच बोलक्या ठरल्या. बहारो फूल बरसाओचा रसाळपणा आजही कायम आहे. नवरदेव लग्नमंडपात येतो तेव्हा नवरी त्याची प्रतीक्षा करीत असते. स्वागत समारोह आटोपतो अन् तो बोहल्यावर चढण्यासाठी सज्ज होतो. नेमके यावेळी गाणे वाजविले जाते. गीताने केलेले विक्रम १४ व्या फिल्म फेअर अवॉर्डमध्ये सूरज चित्रपटातीने गीतकार, संगीतकार व गायक असे तिन्ही 'नंबर वन' चे बक्षीस पटकावले होते. भारतीय सिनेमास १00 वर्षे पूर्ण झाले त्यानिमित्ताने बीबीसी एशियन नेटवर्कने आॅनलाईन सर्वे केला. त्यात १00 सुपरहिट गाण्यांची यादी करण्यात आली. त्यात 'मोहम्मद रफीने गायलेले 'बहारों फूल बरसाओ' या गाण्याला 'नंबर वन' चे स्थान मिळाले.