शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
5
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
6
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
7
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
8
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
9
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
10
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
11
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
12
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
13
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
14
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
15
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
16
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
17
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
18
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
19
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
20
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!

संपकरी अंगणवाडी सेविकांना ‘शो कॉज’; खुलासा सादर करण्याचे आदेश

By जितेंद्र दखने | Updated: January 4, 2024 23:05 IST

महिला व बालकल्याण विभागाची कार्यवाही : खुलासा सादर करण्याचे आदेश

अमरावती: जिल्हाभरात गत महिनभरापासून २ हजार ४६२ अंगणवाडी सेविका, मदतनीस विविध मागण्यांसाठी संपावर गेल्या आहेत. यामुळे सर्व अंगणवाडी केंद्राना टाळे लागले आहेत. परिणामी आता जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने संपावर गेलेल्या अंगणवाडी सेविकांना विना परवानगीने गैरहजर असल्याचे कारण पुढे २३१५ अंगणवाडी सेविका, १४७ मिनी अंगणवाडी सेविका आणि २४०० मदतनीस आदींना नोटीस बजाविलेल्या आहेत.

अंगणवाडी सेविकांना दरमहा २६ हजार आणि मदतनीसांना २० हजार रुपये मानधन द्या, कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी गत ४ डिसेंबर पासून जिल्हाभरातील २३१५ अंगणवाडी सेविका आणि २४०० मदतनीस आणि १४७ मिनी अंगणवाडी सेविका बेमुदत संपावर गेलेल्या आहेत. या संपामुळे महिनाभरापासून अंगणवाड्यांना टाळे लागले. याअनुषंगाने जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाने संपावर गेलेल्या अंगणवाडी सेविकांना विना परवानगीने गैरहजर असल्याने अंगणवाडी केंद्रातील कामकाज खोळंबलेले आहेत. विशेष म्हणजे नव्याने अंगणवाडी सेविका म्हणून रुजू होऊन एक वर्षाचाही कालावधी झाला नाही. नियुक्ती आदेशाद्वारे करारनाम्यामध्ये अंतर्भूत असून काम असमाधानकारक असल्यास कोणत्याही प्रकारची पूर्वनोटीस न देता कामावरून कमी करण्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. त्यानुसार कामावर हजर होण्याबाबत वारंवार कळविले आहे. परंतु यावर कुठलाही खुलासा केलेला नसल्याने तसेच अंगणवाडी केंद्रात विना परवानगी गैरहजर राहणे, अंगणवाडी केंद्रामध्ये अस्वच्छता पाळणे, कामकाज खोळंबलेली आहेत. बालकांची काळजी घेण्याबाबत न सांगणे, बालकांचे लसीकरणकरिता केंद्रात न आणणे या कृतीमुळे पहिल्या टप्प्यात नव्याने नियुक्त केलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना कारणे दाखवा नोटीस बजाविलेल्या आहेत. दुसऱ्या टप्यात इतरही अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याची प्रक्रिया सुरू आहे. यावर प्रशासनाने संबंधितांना खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत. समाधानकारक खुलासा सादर न केल्यास कडक कारवाईचा इशारासुद्धा दिला आहे.सर्व नवनियुक्त अंगणवाडी सेविका, मदतनीस पहिल्या टप्प्यात कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या आहे. यामुळे यापैकी बहुतांश सेविका मदतनीस कामावर हजर झाल्यात. उर्वरित अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना नोटीस बजाविण्याची कार्यवाही सुरू आहे. तात्काळ खुलासा सादर न केल्यास कडक कारवाई केली जाईल.डॉ. कैलास घोडके, डेप्युटी सीईओ महिला व बालकल्याण विभाग

जिल्हाभरातील अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी आपल्या न्यायिक मागण्यांसाठी गत ४ डिसेंबरपासून संप पुकारला आहे. मात्र प्रशासनाकडून सन २००७ च्या परिपत्रकांचा अनर्थ करून चुकीच्या पद्धतीने सेविका व मदतनीस यांना नोटीस बजाविलेल्या. नोटीस बजावण्याबाबत सरकारी नियम, कायदा नसताना हा प्रकार चुकीचा आहे. याविरोधात येत्या ८ तारखेला तीव्र आंदोलन केले जाईल.महेश जाधव, जिल्हाध्यक्ष अंगणवाडी, बालवाडी कर्मचारी युनियनचे आयटक

दृष्टिक्षेपातएकूण सेविका-२३१५मदतनीस-२४००मिनी अंगणवाडी सेविका-१४७कर्तव्यावर हजर झालेल्या सेविकाअंगणवाडी सेविका-६५मदतनीस-३८५मिनी अंगणवाडी सेविका-०२

टॅग्स :Amravatiअमरावतीanganewadi jatraआंगणेवाडी