शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

शॉर्टकट रेल्वे क्रॉसिंग ठरते जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 05:01 IST

रेल्वे रूळ ओलांडून जाण्याची नागरिकांची पद्धत ही अवैध आणि जीवघेणी आहे. रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करू नये, हे जीवघेणे ठरणारे आहे, असे स्थानकावर वारंवार उद्घोषकाद्वारे सूचना केल्या जातात. या सूचनांचा अव्हेर रेल्वेचे चालक-गार्ड यांच्याकडूनही होतो. फलाटाला लागून असलेल्या पादचारी पुलाचा वापर न करता ते थेट विश्रांतीसाठी असलेली लॉबी गाठतात. मालवाहतुकीमुळे रेल्वे स्थानकावर चालक, गार्ड यांची रेलचेल वाढली आहे.

ठळक मुद्देपुलावरून पायपीटचा कंटाळा : नागरिकांसह रेल्वे कर्मचाऱ्यांकडून नियमाला ठेंगा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रेल्वे रुळावरून क्रॉसिंग करता येत नाही, अशी रेल्वे विभागाची नियमावली आहे. मात्र, बडनेरा रेल्वे स्थानक परिसरात नागरिकांसह रेल्वे कर्मचारीसुद्धा रेल्वे क्रॉसिंगद्वारे शॉर्टकट मार्ग शोधतात. गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास अवघ्या पाच मिनिटांत १५ जणांनी रूळ ओलांडून बडनेरा रेल्वे स्थानक पार केले. यावरून दिवसभराचा अंदाज येऊ शकतो. हल्ली प्रवासी गाड्या बंद असल्या तरी रेल्वेची मालवाहतूक सुरू आहे.रेल्वे रूळ ओलांडून जाण्याची नागरिकांची पद्धत ही अवैध आणि जीवघेणी आहे. रेल्वे रूळ ओलांडून ये-जा करू नये, हे जीवघेणे ठरणारे आहे, असे स्थानकावर वारंवार उद्घोषकाद्वारे सूचना केल्या जातात. या सूचनांचा अव्हेर रेल्वेचे चालक-गार्ड यांच्याकडूनही होतो. फलाटाला लागून असलेल्या पादचारी पुलाचा वापर न करता ते थेट विश्रांतीसाठी असलेली लॉबी गाठतात. मालवाहतुकीमुळे रेल्वे स्थानकावर चालक, गार्ड यांची रेलचेल वाढली आहे. फलाटावर ये-जा करण्यासाठी पादचारी पूल, स्वयंचलित पायऱ्या, रॅम्पची व्यवस्था आहे. तथापि, रेल्वेचे चालक, गार्ड हेच नियम गुंडाळून रेल्वे क्रॉसिंग ओलांडून ये-जा करतात. हीच या परिसरातील नागरिकांचीही तºहा आहे.माताफैल परिसरातून सर्रास रेल्वे क्रॉसिंगमाताफैल भागातील रहिवासी रेल्वे रूळ ओलांडूनच ये-जा करतात. बाजारपेठ, रोजगार अथवा कामानिमित्त नवीवस्ती भागात ये-जा करणाऱ्यासाठी याच शॉर्टकटला ते प्राधान्य देत आले आहे. ही बाब कोणत्याही क्षण जीवघेणी ठरू शकते.रेल्वे सुरक्षा बलाचे दुर्लक्षबडनेरा रेल्वे स्थानक परिसरात चालक, गार्ड यांच्या विश्रांती, जेवणाच्या सुविधेसाठी लॉबी आहे. या लॉबीच्या बाजूला रेल्वे सुरक्षा बलाचे कार्यालय आहे. रेल्वे रूळ ओलांडूनच लॉबीमध्ये ये-जा करीत असताना चालक, गार्ड हे आरपीएफ अधिकाऱ्यांना दिसू नये, याचे आश्चर्य मानले जात आहे. सामान्य प्रवासी अथवा नागरिकांनी रेल्वे क्रॉसिंग केले, तर कायदेशीर कारवाई केली जाते. ही नियमावली चालक, गार्ड यांना का लागू नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

टॅग्स :railwayरेल्वे