शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

अल्प कालावधीतील सोयाबीन पीक शेतकऱ्यांना फायद्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 5:00 AM

विदर्भात जवळपास १५ सप्टेंबरपर्यंत पावसाळा असतो. त्यातही परतीचा पाऊस सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पडत असल्याने मध्यम कालावधीच्या पिकांसाठी आवश्यक त्या वेळेत पाणी मिळते. तसेच अत्यल्प कालावधीतील (अर्ली व्हेरायटी) पिकांची उत्पादन क्षमता कमी असते. दीर्घ मुदती पिकांच्या तुलनेत ती क्षमता त्याहीपेक्षा कमी राहते. परंतु, ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे त्यांच्याकरिता अर्ली व्हेरायटीचे वाण फायद्याचे ठरू शकतात.

इंदल चव्हाणलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सोयाबीनचे वाण अल्प कालावधीचे तयार झाले असून ते पावसाच्या दिवसात येत असल्याने शेतकऱ्यांना फायद्याचे ठरणार आहे. अल्प वाणाच्या पिकाची सप्टेंबर महिन्यात सवंगणी होत असल्याने शेत रिकामे होऊन रबी हंगामासाठी तयार करता येते. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पन्नवाढीसाठी हे वाण फायद्याचे ठरू शकते.विदर्भात जवळपास १५ सप्टेंबरपर्यंत पावसाळा असतो. त्यातही परतीचा पाऊस सप्टेंबरच्या अखेरपर्यंत पडत असल्याने मध्यम कालावधीच्या पिकांसाठी आवश्यक त्या वेळेत पाणी मिळते. तसेच अत्यल्प कालावधीतील (अर्ली व्हेरायटी) पिकांची उत्पादन क्षमता कमी असते. दीर्घ मुदती पिकांच्या तुलनेत ती क्षमता त्याहीपेक्षा कमी राहते. परंतु, ज्यांच्याकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे त्यांच्याकरिता अर्ली व्हेरायटीचे वाण फायद्याचे ठरू शकतात. पावसाचे दिवस कमी असले तरीही या पिकांचा कालावधी कमी असल्याने शेतकऱ्यांना मालामाल करू शकते. मात्र, विदर्भात मध्यम वाणाचे पीक सातत्याने घेतले जातात, असे कृषितज्ज्ञ म्हणाले.

जमिनीचा पोत, सिंचन सुविधा आणि पीक पद्धतीवर वाणाची निवड अवलंबून असते. ऑफ सिझनमध्ये सोयाबीनचे उत्पादन घेतल्यास ग्रीन मोझॅकचा प्रादुर्भाव वाढतो.- डॉ. सतीश निचळ, शास्त्रज्ञ, प्रादेशिक सोयाबीन संशोधन केंद्र

शेतकरी म्हणतात....

यंदा अर्ली व्हेरायटी सोयाबीनच्या पाच बॅग पेरणी केली. शेंगाही बऱ्यापैकी आहेत. मात्र, सध्या सततचा पाऊस पिकासाठी धोकादायक ठरण्याची भीती वाटू लागली आहे. १५ दिवसांची उसंत मिळाल्यास बऱ्यापैकी उत्पादन होण्याची आशा आहे.- बलदेव चव्हाण,शेतकरी, मांजरी म्हसला

यंदा अर्ली व्हेरायटीचे सोयाबीन पेरले. पिकाची स्थितीसुद्धा उत्तम होती. मात्र, ऐन फुलोरावर असताना पाऊस राहिल्याने अळ्याचा मारा होऊन पूर्ण फुले फस्त केल्याने शेंगाच धरल्या नाही. यंदा सवंगणीचीही संधी मिळणार नसल्याने मोठे नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.- गोपाल सगणे, शेतकरी, सावळापूर 

झटपट येणारे सोयाबीनजे एस - २००३४, जे एस ९५-६०जेएस-९३-०५, पीडीकेयू अंबा, एनआरसी १४२, एनआरसी १३८मध्यम कालावधीत येणारे सोयाबीनसुवाना सोया, पीडीकेयू येलो, गोल्ड, एमएयूएस-१५८, एमएयूएस-६१२, एमएयूएस-१६२, एनआरसी - ८६जास्त कालावधीत येणारे सोयाबीनएमएयूएस-११८८, फुले संगम, फुले किमया, एनआरसी-३७, जेएस-९७-५२ हे वाण उशिरा येणारे आहेत.

 

 

टॅग्स :agricultureशेती