शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

‘ट्रायबल’मध्ये २७० कोटींच्या फर्निचरची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2019 16:53 IST

शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहांचा कायापालट : केंद्र सरकारच्या ‘जेम’ पोर्टलवरून पुरवठ्याचा निर्णय

- गणेश वासनिक अमरावती : राज्याच्या आदिवासी विकास विभागाने आश्रमशाळा, वसतिगृहांचे कायापालट अभियान हाती घेतले आहे. विद्यार्थ्यांना लागणाºया आवश्यक त्या पायाभूत सोयी, सुविधांची पूर्तता केली जाणार आहे. त्याअनुषंगाने शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहांकरिता २७० कोटी रूपयांचे विविध साहित्य केंद्र सरकारच्या ‘जेम’ पोर्टलवरून खरेदीचा निर्णय घेतला आहे. ‘ट्रायबल’मध्ये आतापर्यंत एकाचवेळी पुरवठा करणारा हा सर्वात मोठा निर्णय ठरला आहे.

‘ट्रायबल’च्या प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्या कल्पकतेतून आदिवासी विद्यार्थ्यांचे ‘कायापालट’ करण्याच्या अनुषंगाने ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. त्यानुसार यापूर्वी राज्यात ५२९ शासकीय आश्रमशाळा आणि ४९१ वसतिगृहांची प्रत्यक्ष पाहणी, सर्वेक्षण झाले. नाशिक, नागपूर, ठाणे व अमरावती अपर आयुक्त कार्यालयांतर्गत शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहातील आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, सोईसुविधांचा पुरवठा केला जाणार आहे. केंद्र सरकारच्या ‘जेम’ पोर्टलवरून साहित्य पुरवठा करण्याबाबत आदिवासी विकास विभागाचे आयुक्त किरण कुलकर्णी यांनी गत दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत शिक्कामोर्तब केले आहे. आश्रमशाळा, वसतिगृहांसाठी एकूण १८ प्रकारचे साहित्य, वस्तू खरेदी केली जाणार आहे. पुरवठ्याची प्रक्रिया ई-निविदेद्वारे होणार असून, जेम पोटर्लवरून अटी, शर्तीनुसार ते खरेदी होणार आहे. पुरवठादाराने यापूर्वी शासकीय साहित्य पुरवठ्याचा तीन वर्षांचा केलेला असावा. १५ कोटींच्या पुरवठ्याचा अनुभव अनिवार्य केला आहे. आता आश्रमशाळा, वसतिगृहात कोणताही विद्यार्थी जमिनीवर अंथरूण टाकून झोपणार नाही, अशी नव्या प्रणालीत व्यवस्था करण्यात आली आहे. 

 

शासकीय आश्रमशाळा, वसतिगृहांमध्ये फर्निचर, शैक्षणिक साहित्य हे फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत पोहचणार अशी यंत्रणा उभारली आहे. नव्या शैक्षणिक सत्रापासून विद्यार्थ्यांना ते वाटप केले जाईल. एकाचवेळी ‘जेम’ पोर्टलवरून साहित्य पुरवठा करण्याचा निर्णय झाला आहे.    - किरण कुलकर्णी,      आयुक्त, आदिवासी विकास विभाग, नाशिक

चारही एटीसींकडून साहित्य, फर्निचरची मागणीनागपूर, ठाणे, नाशिक व अमरावती अपर आयुक्तांनी आश्रमशाळा, वसतिगृहांना लागणारे साहित्य, फर्निचरची मागणी नोंदविली आहे. त्याअनुषंगाने यादी तयार करण्यात आली आहे. यात सिंग्नल बेड, बेंचेस बेड, बंक बेड, कपबोर्ड, डायनिंग टेलब अटॅच सीट, लॉकर्स, लहान बेंच, फ्लॅप चेअर्स, स्टॉप रूम टेबल, टिचर्स चेअर्स, टिचर्स टेबल, संगणक टेबल, एक्झिकेटिव्ह डायनिंग टेबल स्वतंत्र, स्डटी चेअर्स, स्डटी टेबल, कॉम्युटर टेबल, कपबोर्ड होस्टेल, एक्सुकेटिव्ह डायनिंग चेअर्स असे एकुण ५६०, ६९४, ४६१, ४४ एवढ्या संख्येने खरेदी होणार आहे. त्याकरिता सुमारे २७० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजना