शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! शिवशाहीतील आग विझवण्याचे सिलिंडर निरुपयोगी; ३५ प्रवासी थोडक्यात बचावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 20:54 IST

परतवाडा-अमरावती महामार्गावरील घटना

परतवाडा (अमरावती) : अमरावतीहून परतवाड्याकडे येणाºया शिवशाही बसने भूगावनजीक पेट घेतला. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. शिवशाहीमधील अग्निशमनचे सिलिंडर निरुपयोगी ठरल्याने प्रवासी व चालकाने माती टाकून आग विझविली. या घटनेत ३५ प्रवाशांचा जीव थोडक्यात वाचला.परतवाडा आगाराची एमएच ०९ ईएम १६३३ क्रमांकाची शिवशाही बस दुपारी ३़.३० सुमारास ३५ प्रवासी घेऊन अमरावतीहून परतवाड्यासाठी निघाली. भूगावनजीक ती ४ च्या सुमारास अचानक बंद पडली आणि स्टेअरिंग जवळून धूर व आगीच्या ज्वाळा निघायला सुरुवात झाली. हा प्रकार पाहून चालक एम.बी. तायडे यांनी तात्काळ सर्व प्रवाशांना बाहेर काढले आणि शिवशाहीतील अग्निशमनचे सिलिंडर उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो निष्फळ ठरला. प्रवासी व चालकाने गांभीर्याचा परिचय देत रस्त्याच्या कडेवर असलेली माती टाकून पेटती गाडी विझवण्यासाठी केलेला प्रयत्न यशस्वी ठरला. 

तिसऱ्या एसटी बसमध्ये सापडले सिलिंडरपरतवाडा-अमरावती मार्गावर परिवहन महामंडळाच्या बस दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतराने धावतात. पेट घेतलेल्या शिवशाही बसपुढून दहा मिनिटांच्या अंतरात तीन बस गेल्या. त्यातील दोन बसमध्ये अग्निशमन सिलिंंडर नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. तिसऱ्या बसमध्ये सिलिंडर होते. मात्र, तोपर्यंत शिवशाही बसला लागलेली आग आटोक्यात आली होती. अचलपूर तालुक्यातील देवगावचे सरपंच गजानन येवले, उपसरपंच सोनूजी खडके हे या बसमधून प्रवास करीत होते. त्यांनीही आग विझवण्यास मदत केली.

टॅग्स :Shivshahiशिवशाहीstate transportएसटी