शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

शिवसेनेत खांदेपालट !

By admin | Updated: January 11, 2015 22:41 IST

विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेला एकही आमदार निवडून आणता आला नाही. अंतर्गत वादामुळेच शिवसेनेला हे वाईट दिवस आले आहेत. आता पुन्हा नव्या दमाने संघटनात्मक बांधणीसाठी

हालचाली सुरु : नव्या जिल्हाप्रमुखपदासाठी लॉबिंगअमरावती : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यात शिवसेनेला एकही आमदार निवडून आणता आला नाही. अंतर्गत वादामुळेच शिवसेनेला हे वाईट दिवस आले आहेत. आता पुन्हा नव्या दमाने संघटनात्मक बांधणीसाठी शिवसेनेत खांदेपालटाचे वारे वाहू लागले आहे. नव्याने जिल्हाप्रमुख, शहराध्यक्षपदी वर्णी लागावी, यासाठी अनेकांनी ‘मातोश्री’च्या पायऱ्या झिजवायला सुरूवात केली आहे.शिवसेनेचे विद्यमान जिल्हाप्रमुख माजी आमदार संजय बंड, महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेता प्रशांत वानखडे, बाळासाहेब हिंगणीकर हे आहेत. तर महानगर प्रमुखपदी दिंगबर डहाके हे आहेत. लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीतही पक्षविरोधी कारवाया झाल्या. अंतर्गत विरोधातून करण्यात आलेल्या मोर्चेबांधणीचा फटका विधानसभा निवडणुकीत अभिजित अडसूळ, संजय बंड, नाना वानखडे यांना प्रामुख्याने बसला. खासदारविरोधात एकवटलेविधानसभा निवडणुकीत सपाटून मार खावा लागलेल्या शिवसेनेत जिल्ह्यात आजही एकमेकांना पदावरुन हटविण्याची मोहीम जोरात राबविली जात आहे. अध्यक्ष पद कसे मिळेल, यासाठी नेत्यांना गळ घातली जात आहे. जिल्हाप्रमुख, शहराध्यक्ष पदांवर असलेल्यांना बाजुला ठेवण्याची रणनिती तयार होत आहे. जानेवारीच्या अखेर शिवसेनेत फेरबदल होणार असल्याची माहिती आहे. खा. आनंदराव अडसूळ यांच्या विरोधात असलेले जिल्ह्यातील शिवसेनेचे पदावर नसलेले नेते एकवटले आहेत. विशेषत: शनिवारी येथे एका हॉटेलमध्ये शिवसेनेचे नेते तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्या सत्कार सोहळ्याला खासदार अडसूळ विरुद्ध असलेल्या समर्थकांचा भरणा सर्वाधिक दिसून आला. ना. दिवाकर रावते यांचा दौरा शासकीय असला तरी या दौऱ्याने नाराज असलेल्या शिवसैनिकांना संजिवनी मिळण्याचे संकेत आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख पदी कोणाची वर्णी लागेल, हे अद्याप स्पष्ट नसले तरी ना. रावतेंच्या दौऱ्याने अनेकांची नावे चर्चित आली आहेत. यात शिवसेना जिल्हाप्रमुख पदासाठी जिल्हा परिषदेचे सदस्य सूधीर सुर्यवंशी, माजी खा. अनंत गुढे, सोमेश्वर पुसतकर व सिद्धेश्वर चव्हाण यांची नावे आघाडीवर असल्याची माहिती आहे. अमरावती शहर प्रमुख पदासाठी नगरसेवक प्रवीण हरमकर, अमोल निस्ताणे, प्रकाश मंजलवार, सुनील खराटे, पंजाबराव तायवाडे यांची नावे आघाडीवर आहेत. शिवसेनेत गटतट वाढल्याचा पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुखपदी कोणाची वर्णी लागेल, हे लवकरच स्पष्ट होईल.