शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

शिवटेकडीवर शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 22:36 IST

शिवटेकडीवर शिवाजी महाराजांचा १२ फुटी ब्रांझचा अश्वारुढ पुतळा त्याच ठिकाणी बसविण्यासाठी कंत्राटदारासोबत करारनामा करण्यास सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 'क्ले मॉडेल'ला कला संचालनालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुतळ्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती सभापती बाळासाहेब भुयार यांनी दिली.

ठळक मुद्दे‘स्थायी’ची मंजुरी : उंची १२ फूट, ब्रांझ धातूचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शिवटेकडीवर शिवाजी महाराजांचा १२ फुटी ब्रांझचा अश्वारुढ पुतळा त्याच ठिकाणी बसविण्यासाठी कंत्राटदारासोबत करारनामा करण्यास सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 'क्ले मॉडेल'ला कला संचालनालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुतळ्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती सभापती बाळासाहेब भुयार यांनी दिली.स्थायी समितीच्या बैठकीत तांत्रिक कारणाने आठ विषय रद्द करण्यात आले. दोन विषयांना मान्यता देण्यात आली. शिवटेकडीवर शिवाजी महाराजांचा १२ फुटी ब्रांझचा अश्वारूढ पुतळा बसविण्यासंदर्भात पुतळा समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे ७ जानेवारी २०१९ ला प्रथम निविदा उघडण्यात आली. मात्र, यात दोनच निविदा आल्याने पुन्हा निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यातही प्रतिसाद न मिळाल्याने तिसऱ्यांदा प्रक्रिया राबविण्यात आली. यावेळी तीन निविदा प्राप्त झाल्यात. मात्र, एका निविदाधारकाने कागदपत्राची पूर्तता केली नसल्यामुळे दोनच निविदा ग्राह्य धरण्यात आल्यात. यामध्ये गर्गे आर्ट्स स्टुडीओ ५८ लाख व श्री शिल्पाज आर्ट वर्क्स ४८.२५ लाख रुपयांची निविदा भरण्यात आली. यात ‘शिल्पाज’ची निविदा मंजूर करून कंत्राटदारासोबत करारनामा करण्यासाठी ७ फेब्रुवारीच्या आमसभेत हा विषय ठेवण्यात आला. या सभेत दुरूस्ती सुचविण्यात आली.आचारसंहितेपश्चात समितीच्या बैठकी रद्द झाल्यात. त्यानंतर सोमवारच्या बैठकीत हा विषय ठेवण्यात आला. शिवटेकडीवर सध्या शिवाजी महाराजांचा १२ फुटी ब्रांझचा अश्वारूढ पुतळा अस्तित्वात आहे. त्याच डिझाईनचा नवा पुतळा राहणार असून, नव्याने झालेल्या निविदा प्रक्रियेत कलासंचालनालयाची मंजुरी, या विषयाची अट टाकण्यात आल्यानंतर निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामुळे सदर कंत्राटदारासोबत करारनामा करण्यासंदर्भात प्रशासनाच्यावतीने रविवारच्या बैठकीत विषय ठेवण्यात आल्यानंतर सभेने मंजुरी दिली आहे.महापौरांच्या ‘ब्रिस्ब्रेन’ दौऱ्याला मंजुरीआॅस्ट्रेलियातील ब्रिस्ब्रेन येथे ७ ते १० जुलैदरम्यान होणाऱ्या आशिया पॅसिफीक सिटीज् सुमित २०१९ या परिषदेत उपस्थित राहण्यासाठी महापौर संजय नरवणे यांना निमंत्रण आलेले आहे. या दौºयासाठी ४.८५ लाखांचा खर्च येणार आहे. याला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. हा मान्यतेचा ठराव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे सभापती बाळासाहेब भुयार यांनी सांगितले. आयुक्त संजय नरवणे यांनी २० जून रोजी या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे.