शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांविरोधात शिवसेना शिंदे गटाचे ‘जोडे मारो’ आंदोलन; मानसिक आरोग्य बिघडल्याची टीका

By उज्वल भालेकर | Updated: June 3, 2023 19:43 IST

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शनिवारी राजकमल चौकात शिंदे गटाच्या शिवसेनेकडून ‘जोडे मारो’आंदोलन करण्यात आले.

अमरावती : शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शनिवारी राजकमल चौकात शिंदे गटाच्या शिवसेनेकडून ‘जोडे मारो’आंदोलन करण्यात आले. राऊत यांचे मानिसक आरोग्य ठिकाणावर नसल्याने ते बेताल वक्तव्य व कृती करत असल्याची टिका करत, राऊत यांचा प्रतिकात्मक फोटो असलेल्या पोस्टरला चपला मारुन त्यांचा जाहिर निषेध नोंदविण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी या प्रश्नांवर थू म्हणत थुंकण्यसाची कृती करत प्रतीक्रीया दिली होती. त्यामुळे त्यांच्या या कृतीचा राज्यभरात शिंदे गटाच्या शिवसेनेकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून ‘जोडे मारो’ आंदोलन सुरु करण्यात आले आहे. अमरावतीमध्येही राजकमल चौकात शिंदे गटाने आंदोलन करत राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करुन पोस्टवरील राऊत यांच्या फोटोला जोडे मारुन पोस्टर फाडण्यात आले.

 यावेळी आंदोलनामध्ये शिवसेना जिल्हाध्यक्ष अरुण पडोळे, निशांत हरणे, शिवसेना महानगर प्रमुख संतोष बद्रे, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण दिधाते, शिवसेना शहर प्रमुख आशिष ठाकरे, कामगार सेनेचे वेदांत ताल्हन, महिला आघाडी जिल्हाप्रमुख अरुणा इंगोले, वृंदाताई मुक्तेवार, प्रीती साहु, सीमा ढोले, रश्मी डहाणे, नंदा वाघमारे, नितेश शर्मा, पुरुषोत्तम बनसोड, मुकेश उसरे, संजय देवकर, मनोज पांडे, राजेंद्र देवडा, राजेश घोटे, गुणवंत हरणे, विलास चांद, शुभम परळीकर,शुभम शिंदे, चंदु आठवले, शेख मुजम्मील अंसारी, प्रथमेश बोबडे, गोपाल जाधव, विक्की लसनकर, अमित मेश्राम, आकाश खडसे, सुरज बर्डे, सुरज बहद्दुरकर, अखिल ठाकरे सह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :AmravatiअमरावतीSanjay Rautसंजय राऊत