शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
4
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
5
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
7
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
8
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
9
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
10
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
11
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
12
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
13
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
14
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
15
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
16
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
17
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
18
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
19
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
20
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  

शिवसेना शिंदे गटाच्या शहर अध्यक्षाने १.५६ कोटी हडपले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 13:00 IST

Amravati : नोकरीचे आमिष, चार आरोपींविरुद्ध अंजनगाव पोलिसात गुन्हे दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क अंजनगाव सुर्जी : रेल्वेत नोकरीचे आमिष देऊन तब्बल १८ युवकांची एकूण १ कोटी ५६ लाख रुपयांनी फसवणूक केल्याची घटना अंजनगाव सुर्जी येथे उघडकीस आली. याप्रकरणी १४ जानेवारी रोजी अंजनगाव सुर्जी पोलिसांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर अध्यक्ष योगेश ऊर्फ मुन्ना इसोकार याच्यासह चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पोलिस सूत्रांनुसार, फिर्यादी मंगेश वसंतराव हँड (३८, रा. रामटेकपुरा, अकोट) यांच्या तक्रारीनुसार, मंगेशची योगेशसोबत डिसेंबर २०२१ ला ओळख झाली. एका माजी आमदारामार्फत रेल्वे विभागात नोकरी लावून देतो. त्याकरिता एकूण दहा ते पंधरा जण लागतील. तुम्हाला खर्च करावा लागेल, अशी बतावणी मुन्नाने केली. मंगेशने त्याचे काही नातेवाईक व मित्रांना सोबत घेतले. मुन्नाच्या सांगण्यावरून परतवाडा येथील विलास गोवर्धन जाधव (रा. परतवाडा) तसेच श्रीकांत बाबूराव फुलसावंदे (रा. राजुरा) यांच्याकडे काही रक्कम देण्यात आली. कोटक महिंद्रा बँकेच्या त्रिमूर्तीनगर (नागपूर) येथील खात्यात आरटीजीएसद्वारे ही रक्कम जमा केली.

भायखळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सेंट्रल रेल्वे हॉस्पिटल येथे युवकांची वैद्यकीय तपासणी आटोपली. त्यांची लवकरच रेल्वे अधिकाऱ्यांसोबत अंजनगाव सुर्जी येथे भेट घालून देणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार २३ जानेवारी २०२२ ला मुन्नाने अंजनगाव येथे एका फ्लॅटवर नेऊन श्रीकांत फुलसावंदे, विलास गोवर्धन जाधव (रा. परतवाडा), मॉन्टी ऊर्फ मेघराजसिंह चौहान ठाकूर (रा. मसाजगंज, अमरावती) यांच्यासोबत रेल्वे अधिकारी म्हणून भेट घालून दिली. त्यांनी सर्वाची कागदपत्रे पाहिली. त्यानंतर सर्वांनी मुन्नाच्या घरी आणखी रक्कम दिली. 

४ विरुद्ध गुन्हा योगेश ऊर्फ मुन्ना इसोकार, श्रीकांत फुलसावंदे, विलास जाधव व मॉन्टी ऊर्फ मेघराजसिंह चव्हाण ठाकूर यांच्याविरुद्ध कलम ४१७, ४१९, ४२०, ४६५, ४६८, ४७१, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार प्रकाश अहिरे पुढील तपास करीत आहेत.

थेट जॉइनिंग लेटर मुन्ना इसोकार, श्रीकांत फुलसावंदे, विलास जाधव, मॉन्टी ऊर्फ मेघराजसिंग चव्हाण यांनी सर्वांना सांगितले की, तुम्हाला परीक्षा देण्याची गरज नाही. आम्ही तुमची ऑर्डर काढतो. त्यानुसार सर्वांच्या पत्त्यावर जॉइनिंग लेटर घरी पोस्टाने पाठवले गेले. तथापि, सर्वांनी मुंबई गाठली त्यावेळी अधिकारी सुट्टीवरून परतल्यानंतर जॉईन करण्यात येईल, असे सांगितले गेले.

अशी उकळली रक्कम नीलेश बोडखेकडून १५ लाख, पवन ताळे, सतीश वडाळे, दिनेश सावरकर, प्रल्हाद थोरात, गणेश रेखाते, आदित्य पाकधुणे, अक्षय लोणारे, प्रशांत लाडोळे, सुनीता इंगळे या नऊ जणांकडून प्रत्येकी १० लाख रुपये, मयूर नेमाडेकडून ९ लाख ५० हजार, मंगेश हेंड व विजय दातीर यांच्याकडून प्रत्येकी नऊ लाख, सूरज हटवारकडून आठ लाख, महेंद्र पाखरेकडून सहा लाख, जोशना हेंडकडून पाच लाख, आशिष धर्माळेकडून तीन लाख, गव्हाळे अडीच लाख असे एकूण १ कोटी ५६ लाख रुपये उकळण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

जिवे मारण्याची धमकी फसवणूक लक्षात येताच मुन्ना इसोकार वगळता इतर तिघांना गाठले. चौघांनीही तुमच्याकडून जे होईल ते करून घ्या, आमचे सरकार आहे, अशी धमकी देत त्यांनी युवकांना शिवीगाळ केली.

टॅग्स :Amravatiअमरावतीfraudधोकेबाजी