शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम विदर्भात १९५० व्यक्तींना रोज शिवभोजन थाळी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 19:07 IST

गरीब व गरजू नागरिकांना आता १० रुपये या दराप्रमाणे शिवभोजन थाळी उपलब्ध करण्यात येणार आहे.

अमरावती : गरीब व गरजू नागरिकांना आता १० रुपये या दराप्रमाणे शिवभोजन थाळी उपलब्ध करण्यात येणार आहे. यासाठी पश्चिम विदर्भात प्रत्येक जिल्ह्यात एक याप्रमाणे वर्दळीच्या २२ जागांची पुरवठा विभागाद्वारे पाहणी करण्यात आली. यापैकी पाच ठिकाणी ही केंद्रे मंजूर करण्यात येणार आहेत. या पाच केंद्रांवर रोज १९५० व्यक्तींना सवलतीच्या दरात थाळी मिळणार आहे.दरम्यान अन्न, नागरी पुरवठा विभागाच्या प्रधान सचिवांनी ३० डिसेंबरला पुरवठा उपायुक्त व जिल्हा पुरवठा अधिका-यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग घेऊन सूचना दिल्या व याविषयीचा शासनादेशदेखील बुधवारी निर्गमित केलेला आहे. विभागात अमरावती जिल्ह्यात ५००, अकोला ३००, बुलडाणा ४००, वाशीम ३०० व यवतमाळ जिल्ह्यांत ४५० अशी थाळ्यांची संख्या निश्चित करण्यात आलेली आहे. या केंद्रांकरिता तीन ते चार जागांची पाहणी करण्याचे निर्देश पुरवठा विभागाद्वारे देण्यात आलेले होते. या प्रत्येक ठिकाणी एकाच वेळी किमान २५ व्यक्ती भोजनाला बसू शकतील एवढी जागा आवश्यक असल्याचे पत्रात नमूद आहे.शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या भोजनालयात प्रत्येकी ३० ग्रॅमच्या दोन चपात्या, १०० ग्रॅमची एक वाटी भाजी, १५० ग्रॅम भात व १०० ग्रॅमचे वरण समाविष्ट असणारी शिवभोजनाची थाळी जिल्हा ठिकाणी मंजूर भोजनालयात दुपारी १२ ते २ या कालावधीत मिळणार आहे. यासाठी शहरी भागात ४० व ग्रामीण भागात २५ रुपये प्रतिथाळी अनुदान देय राहणार आहे.अमरावतीमध्ये सर्वाधिक ७ जागांचे प्रस्तावजिल्ह्याचे ठिकाणी एक केंद्र राहणा-या या योजनेत भोजनालय चालविण्यासाठी पश्चिम विदर्भात २२ जागांचे प्रस्ताव समोर आले आहेत. यामध्ये अमरावती शहराकरिता सर्वाधिक सात जागांचे प्रस्ताव आहे. याव्यतिरिक्त अकोला जिल्ह्यात तीन, वाशीम जिल्ह्यात तीन, यवतमाळ जिल्ह्यात चार व बुलडाणा जिल्ह्यात चार जागांचे प्रस्ताव पुरवठा विभागाकडे आहेत. या सर्व वर्दळीच्या ठिकाणांपैकी एका ठिकाणी शिवभोजन केंद्र सुरू करण्यात येणार आहे.