शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटात आढळला दुर्मिळ 'शिटीमार रानभाई'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 20:38 IST

मेळघाटात दुर्मिळ 'शिटीमार रानभाई' पक्षी आढळून आल्याने वन्यजीव अभ्यासकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

ठळक मुद्दे इंग्रजीत 'ब्राऊन-चिक अ‍ॅलसेपी'

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मेळघाटात दुर्मिळ 'शिटीमार रानभाई' पक्षी आढळून आल्याने वन्यजीव अभ्यासकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. हा पक्षी मुख्यत: पूर्व आणि पश्चिम घाटात आढळत असल्याने मध्य भारतातील ही दुर्मिळ नोंद आहे.मेळघाटात एका पक्षी सर्वेक्षणादरम्यान युथ फॉर नेचर कन्झवळेशन सोसायटीचे धनंजय भांबूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना या पक्षाचे दर्शन झाले. त्याची फोटोवरून ओळख पटविण्यास अभिमन्यू आराध्य व पक्षी अभ्यासक कृष्णा खान यांची मदत झाली.हा साधारणत: चिमणी पेक्षा थोडा लहान पक्षी आहे. एका रहिवासी पक्ष्याची ही पोटजात आहे. आखूड चोच, चेहरा व शेपूट तपकीरी, डोके राखाळी, पाठ मेंहदी रंगाच्या पंखांनी झाकली असून उदर पिंगट-पिवळसर असते. परागकण आणि छोटे किडे त्याचे आवडते खाद्य आहे. २००९ मध्ये हा पक्षी दिसल्याची विदेशी निरीक्षकांची नोंद आहे, अशी माहिती भांबूरकर यांनी दिली. पूर्वी या पक्ष्याची गणना 'फुलवेटा' या कुळात होत असे मात्र, नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनामुळे आता हा पक्षी 'अ‍ॅलसेपी' या कुळात मोडत असून, याला इंग्रजीत 'ब्राऊन-चिक अ‍ॅलसेपी' असे म्हटले जाते. यापूर्वी शिटीमार मध्यभारतात १९३५ साली मध्यप्रदेशातील पंचमढी आणि बालाघाट व १९३९ साली बैतूल जिल्ह्यात आढळल्याची बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या संशोधन पत्रिकेत नोंद असल्याने महाराष्ट्रातील मेळघाटात या पक्ष्याचे वास्तव्य अत्यंत दुर्मिळ योग आहे, असे पक्षी अभ्यासक कृष्णा खान यांनी सांगितले.

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य