शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

शिरजगाव ‘पाणीदार’ होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 01:02 IST

यंदाच्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि बागायती शेतीला पुन्हा सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी येथील तरुणांनी पुढाकार घेऊन ‘गाव माझा विकास समिती’ची स्थापना केली आहे. या समितीच्या पुढाकाराने तब्बल आठ लाख रुपये लोकवर्गणी गोळा करण्यात आली.

ठळक मुद्देगाव माझा विकास समिती : जलसंधारणाच्या कामाला गती

मनोहर सुने।लोकमत न्यूज नेटवर्कशिरजगाव कसबा : यंदाच्या भीषण पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि बागायती शेतीला पुन्हा सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी येथील तरुणांनी पुढाकार घेऊन ‘गाव माझा विकास समिती’ची स्थापना केली आहे. या समितीच्या पुढाकाराने तब्बल आठ लाख रुपये लोकवर्गणी गोळा करण्यात आली. त्यातून नाला खोलीकरण व जलसंधारणासाठी आवश्यक असलेली कामे हाती घेण्यात आली आहेत. तरुणाईच्या या प्रेरक प्रयत्नांमुळे शिरजगाव कसबाची ‘पाणीदार’ गावाकडे वाटचाल सुरू झाली आहे.चांदूरबाजार तालुक्यात सर्वाधिक लोकसंख्येचे गाव म्हणून ओळख असलेल्या शिरजगाव कसबा येथे काही वर्षांपासून भीषण जलसंकट निर्माण झाले आहे. परिसरातील ९० टक्के शेती ओलिताखाली असल्याने पाण्याची नितांत गरज आहे. संत्रा झाडे जगविण्यासाठी मोठ्या प्रमाणात सिंचनाची गरज असल्याने बोअर व विहिरी करण्यात आल्या. मात्र, बेसुमार उपशामुळे या भागातील पाणीपातळी अत्यंत खोल गेली आहे. विहिरीची १५०, तर बोअरची पातळी २०० ते २५० फुटांखाली गेली आहे. त्यामुळे पेयजलासोबत सिंचनाची समस्या उभी ठाकली. त्या अनुषंगाने गावातील काही युवकांनी ‘गाव माझा विकास समिती’ स्थापन करून गावातील पाणीप्रश्नावर कार्यास प्रारंभ केला. ही समिती जनजागृती बैठका, सभा घेऊन पाणीटंचाईची माहिती देत आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई