शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भात रंगला ढाल पूजन उत्सव, दोन दिवस चालणार उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 04:47 IST

दिवाळीच्या पाडव्याला विदर्भातील पाच हजार गावांत शुक्रवारी ढाल पूजन उत्सव साजरा करण्यात आला़ डफळीची ताल व दाद-याच्या निनादात आदिवासी गोवारी युवकांनी गोहळा-गोहळीचे नृत्य सादर केले.

- मोहन राऊत अमरावती : दिवाळीच्या पाडव्याला विदर्भातील पाच हजार गावांत शुक्रवारी ढाल पूजन उत्सव साजरा करण्यात आला़ डफळीची ताल व दाद-याच्या निनादात आदिवासी गोवारी युवकांनी गोहळा-गोहळीचे नृत्य सादर केले़चकाचका चांदणी वो गोवारीयो बिनो़, गायनेसे कोटा भरे, घरघर देबो आशिष गा़़़ असा दादºयाचा निनाद घेत युवकांनी या उत्सवाला सुरुवात केली़ सकाळी गावातील पाळीव पशुंना सजविण्यात आले. सायंकाळी सर्व गाईगुरांना गावातून फिरवून फटाक्यांच्या आतषबाजीत प्रत्येक गाईला हंबरेपर्यंत नाचवण्यात आले.दिवाळीच्या दोन दिवसांपूर्वी दोन बाशांवर फाडक्या बांधून पुरुष ढाल म्हणजे गोहळा, तर स्त्री ढाल म्हणजे गोहळी उभारण्यात आली होती़शुक्रवारी दुपारी प्रथम ढाल सुताराच्या घरी पाणी पिण्याकरिता नेण्यात आली. यानंतर आदिवासी गोवारी नृत्याला प्रारंभ झाला़ डफळी व मुरलीच्या निनादात दाद-याची मैफल रंगल्याने नृत्यात अधिकच रंगत आली़ पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा या जिल्ह्यात हा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला़गोंडी धर्माची रक्षण करणारी ढालढाल ही गोंडी धर्माची रक्षण करणारी असून, ती कदंब वृक्ष, काटसावरी व मोहाचे झाड यापासून तयार करण्यात आली. गोंडी धर्माचा धर्मगुरू कोपाल वंशाचा होता़ कोपाल म्हणजे गोवारी. गोंडी धर्माची स्थापना त्याकाळी शंभू गवारी यांनी केली. तेव्हापासून हा उत्सव सुरू आहे़अमरावती, यवतमाळात जल्लोषअमरावती जिल्ह्यातील २८ गावांत, तर धामणगाव तालुक्यातील विटाळा, कावली, कामनापूर घुसळी यांसह आठ गावात ढाल पूजन करण्यात आले़ विटाळा येथील सरपंच मंगेश ठाकरे, उपसरपंच नितीन वाघाडे, लक्ष्मण ठाकरे, प्रीतम ठाकरे, जगन राऊत यांनी गुराखी नंदू जानराव चचाणे यांच्या घरी, यवतमाळ जिल्ह्यातील वडगाव येथे दवीदास कोयरे यांच्याकडे अखिल भारतीय गोंडवाना पार्टीचे प्रदेश अध्यक्ष डॉ़विवेक चौधरी, सचिन चचाणे, मनोहर शहारे, रामदास नेवारे, राजाभाऊ ठाकरे, शामा कोलाम ब्रिगेडचे अध्यक्ष शैलेश गाडेकर यांच्या उपस्थितीत उत्सव पार पडला. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये आगामी पाच दिवस हा उत्सव साजरा करण्यात येत आहे़ आदिवासींची परंपरा जोपासण्यासाठी गोवारी युवकांनी या जिल्ह्यात पुढाकार घेतला आहे़

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र