शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

मेंढपाळ-वनकर्मचाऱ्यांत चिरोडी जंगलात संघर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2018 21:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : वनचराईवर बंदी असताना चिरोडी वर्तुळातील वनखंड क्रमांक ३०७ सावंगा बिटमध्ये चार मेंढ्या बंदिस्त करण्यात आल्या. या जंगलात वनकर्मचाऱ्यांनी काठेवाडी गुरे व मेंढ्यांना चराईसाठी बंदी घातल्याने शनिवारी सावंगा बिटमध्ये मेंढपाळ व वनकर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष पेटला. मेंढपाळ वनरक्षकाच्या अंगावर काठी घेऊन धावल्याने मेंढपाळ व वनकर्मचाऱ्यांत संघर्ष निर्माण झाला.चांदूर ...

ठळक मुद्देवनचराईवर बंदी घातल्याने मेंढपाळ संतापले : वनरक्षकावर हल्ल्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : वनचराईवर बंदी असताना चिरोडी वर्तुळातील वनखंड क्रमांक ३०७ सावंगा बिटमध्ये चार मेंढ्या बंदिस्त करण्यात आल्या. या जंगलात वनकर्मचाऱ्यांनी काठेवाडी गुरे व मेंढ्यांना चराईसाठी बंदी घातल्याने शनिवारी सावंगा बिटमध्ये मेंढपाळ व वनकर्मचाऱ्यांमध्ये संघर्ष पेटला. मेंढपाळ वनरक्षकाच्या अंगावर काठी घेऊन धावल्याने मेंढपाळ व वनकर्मचाऱ्यांत संघर्ष निर्माण झाला.चांदूर रेल्वे वनपरिक्षेत्रांतर्गत चिरोडी जंगलात मेंढपाळांमुळे या जंगलाचे नुकसान टाळण्यासाठी पाहरा-चिरोडी वनकर्मचाऱ्यांनी गस्त वाढविली आहे. जंगलाशेजारी दहा ते बारा ठिकाणी काठोवडी, मेंढपाळांची राहुटी असून, त्यांच्याकडे सुमारे ५ ते १० हजार गुरे व मेंढ्या आहेत. वनविभागाने यंदा जंगलात चराईवर बंदी घातली होती. शनिवारी सावंगा बीटमध्ये राखीव रोपवनात मेंढ्या चराई करताना आढळल्या. वनाधिकाऱ्यांचे पथक पाहून मेंढपाळांनी २०० मेंढ्या पळविल्या. घटनास्थळी ४ मेंढ्या पकडल्याने वनकर्मचारी व मेंढपाळ यांच्यात संघर्ष पेटून एकमेकांवर धावून आले.या पथकाने केली कारवाईचांदूररेल्वे वनपरिक्षेत्र अधिकारी आशीष कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिरोडी वर्तुळाचे वनपाल एम.के. निर्मळ, वनरक्षक अलका मंजुळकर, राजन हिवराळे, रवींद्र विधळे, गोविंद पवार, अभिजित बगळे, अभिषेक कथलकर, वनमजूर रफिक शेख, मंगल जाधव, रामु तिळके, राजू चव्हाण, शालिक पवार यांनी सहकार्य केले. चिरोडी वर्तुळाचे वनपाल एम.के. निर्मळ यांनी वनगुन्हा जारी केला असून, पुढील चौकशी करीत आहे.