शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

रक्त सांडवू; पण जमिनी देणार नाही!

By admin | Updated: July 30, 2016 00:02 IST

पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलेली वडिलोपार्जित शेतजमीन मुंबई-नागपूर या सुपर एक्सप्रेस हायवेसाठी अल्प मोबदल्यात अधिग्रहित करण्याचा सपाटा शासनाने सुरू केला आहे.

वीरेंद्र जगताप आक्रमक : महामार्ग जमीन अधिग्रहण मुद्दा सभागृहात गाजला अमरावती : पोटच्या गोळ्याप्रमाणे सांभाळलेली वडिलोपार्जित शेतजमीन मुंबई-नागपूर या सुपर एक्सप्रेस हायवेसाठी अल्प मोबदल्यात अधिग्रहित करण्याचा सपाटा शासनाने सुरू केला आहे. मात्र, प्रत्यक्षात या जमिनीचा मोबदला शेतकऱ्यांना सरणावर गेल्यानंतर मिळणार काय, असा संतप्त सवाल धामणगाव विधानसभा मतदारसंघाचे अभ्यासू आमदार वीरेंद्र जगताप यांनी विधानसभेत आक्रमकपणे मांडला.त्यामुळे प्रसंगी रक्त सांडवू पण अल्प मोबदल्यात जमिनी देणार नाही़, असा निर्वाणीचा इशारा यावेळी आ. जगताप यांनी दिला. महराष्ट्र समृद्धी कॉरीडोर प्रकल्प म्हणजे मुंबई-नागपूर हा ७१० किलोमीटर लांबीचा सुपर एक्सप्रेस हायवे धामणगाव तालुक्यातील १५, चांदूररेल्वे तालुक्यातील ९ आणि नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील १९ गावांमधून जाणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी आ़वीरेंद्र जगताप यांनी विधानसभेत नियम २९३ अन्वये लक्ष्यवेधी मांडली. ते म्हणाले, प्रकल्पाकरिता जमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध नाही़ मात्र, जिरायती क्षेत्र ५० हजार व बागायती क्षेत्र १ लाख असा मोबदला शासन शेतकऱ्यांना देणार आहे, हा मोबदला अत्यल्प आहे़ संबंधित प्रकल्पाचा शेतकऱ्यांनी धसका घेतला आहे़ शेतजमीन गेली तर कुटुंबाचे काय होणार, या विवंचतनेत शेतकरी आहेत़ धामणगाव तालुक्यातील भिल्ली येथील ज्ञानेश्वर काळमेघ यांच्या १० एकर शेतातून हा हायवे जाणार असल्याचे ऐकूनच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला़ याची जबाबदारी सरकारने स्वीकारणे गरजेचे असल्याचे आ़जगताप म्हणाले. (प्रतिनिधी)शासनाने शेतकऱ्यांना बळ द्यावे शासनाने शेतकऱ्यांचे बळी न घेता त्यांना बळ द्यावे. मात्र, शेतकऱ्यांचे कोणत्याच स्तरावर समाधन न करताच जमिनी बळकाविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे़ आता शेतकऱ्यांचे मुडदे पाडूनच त्यांच्या जमिनी शासनाला मिळू शकतील. मग, रक्त सांडले तरी चालेल, असा शेतकऱ्यांचा निर्धार आहे़ एकीकडे धरणात गेलेल्या पाच गावांचे पुनर्वसन करण्यासाठी २०-२० वर्षे लागतात, तर नवीन घरे निर्माण व्हायला किती वर्षे लागतील, असा सवालही आ. जगताप यांनी सभागृहात उपस्थित केला. -हा तर मुख्यमंत्र्यांचा डाव ३० हजार कोटींची रक्कम खर्चून सन २०१९ पर्यंत हा महामार्ग पूर्ण करण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस स्वत: मागे राहून शिवसेनेच्या मंत्र्यांकडून कामे करून घेत आहेत. हा मुख्यमंत्र्याचाच डाव आहे़ ज्या शेतकऱ्यांची जमीन या प्रकल्पांत जाणार आहे ते शेतकरी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत. या महामार्गामुळे पुढे सत्तारूढ होणाऱ्या सरकारसमोर कर्जाचा डोंगर उभा राहणार आहे़ त्यामुळे वरूड मतदारसंघातून हा सुपर एक्सप्रेस हायवे न्यावा, अशी मागणी आ़वीरेंद्र जगताप यांनी विधानसभेत केली़ शेतकऱ्यांनी पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलेली जमीन हिसकावण्याचा शासनाचा प्रयत्न हाणून पाडू, असेही ते यावेळी म्हणाले.सन २०१३ च्या भूसंपादन कायद्याप्रमाणे शासनाने बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीचा पाचपट भाव व दहा वर्षे जगण्यासाठी पुरेल इतकी रक्कम द्यावी. तसेच नवीन शहरामध्ये विकसित भूखंड द्यावा. विशेषत: या प्रकल्पात शेतकऱ्यांची भागिदारी कायम ठेवून जिरायती क्षेत्रांना प्रती हेक्टर १ लाख रूपये तर बागायती क्षेत्रांना प्रती हेक्टर २ लाख रूपये तसेच सर्व जमिनीचा एकरकमी मोबदला प्रथम शासनाने द्यावा त्यानंतरच शेतकऱ्यांची जमीन घ्यावी.- वीरेंद्र जगताप,आमदार, धामणगाव विधानसभा मतदारसंघ