शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जाती-धर्मापल्याड जाऊन ‘तिने’ निभावला शेजारधर्म !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 00:02 IST

जाती-धर्मासाठी एकमेकांचे प्राण घेण्यासाठी, रक्तपातासाठी एका पायावर तयार असलेला एक समूह ....

२० वर्षांचा सहवास : वहिदाच्या सुश्रुषेत विमलाने सोडले प्राण वैभव बाबरेकर । लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जाती-धर्मासाठी एकमेकांचे प्राण घेण्यासाठी, रक्तपातासाठी एका पायावर तयार असलेला एक समूह आणि नेत्रहीन हिंदू दाम्पत्याचा केवळ शेजारधर्म, माणुसकी म्हणून अनेक वर्षे सांभाळ करणारी वहिदा बानो. एकाच समाजात आढळणारी ही दोेन टोेके. पण, जेथे धर्मवेड्यांचा उत्पात चालतो, त्याच समाजात जाती-धर्माच्या भावनेचा कुठलाही स्पर्श न होऊ देता एकमेकांना जिवापाड जपणाऱ्या ‘वहिदा-विमला’देखील सापडतात. एखादी वहिदा एखाद्या अंध विमलाचा मरेपर्यंत सांभाळ करते आणि पुन्हा एकदा निकोप समाज निर्मितीच्या आशा पल्लवीत होतात. ‘ते’ दाम्पत्य नेत्रहीन. फ्रेजरपुरा पोेलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या राहुलनगरात मागील २० वर्षांपासून त्यांचे वास्तव्य आहे. विमलाबाई व मुरारी अवचरकर असे या दाम्पत्याचे नाव. घरात अठराविश्वे दारिद्रय. दृष्टीहीन असल्याने उत्पन्नाचे साधनही नाही. लोकांनीच सामूहिक वर्गणी करून बांधून दिलेल्या झोपडीवजा घरात त्यांचे वास्तव्य. या दाम्पत्याला एक मुलगी. तीदेखील विवाहित. सध्या तिचे वास्तव्य गुजरातेत आहे. त्यामुळे अंध विमलाबाई व मुरारी यांच्या देखभालीचा प्रश्न निर्माण झाला. पण, शेजारीच राहणारी मुस्लिम महिला वहिदा बानो पुढे आली. जाती-धर्माच्या पल्याड जाऊन तिने या दाम्पत्याची काळजी घेणे सुरू केले. विमलाबाई आणि मुरारी यांना जेवणाचा डबा पोहोचविणे, त्यांची इतर देखभालही तीच करीत असे. कित्येक वर्षे हा क्रम चालला. पण, काळच तो. कुणासाठी थांबणार कसा? दोन वर्षांपूर्वी आजाराने ग्रासलेल्या मुरारी अवचरकर यांचे निधन झाले आणि विमलाबाई एकट्या पडल्या. पण, वहिदा बानो यांनी त्यांची साथ सोडली नाही. त्या अधिक आपुलकीने विमलाबार्इंची काळजी घेऊ लागल्या. जाती-धर्म विलग असले तरी त्यांची सलगी सख्ख्या बहिणींसारखीच होती. वहिदा बानो यांनी त्यांचा हा भगिनीधर्म अखेरपर्यंत निभावला. अखेर त्यांच्याच सुश्रुशेत आणि त्यांच्याच आश्रयाने विमलाबार्इंनी काल रविवारी अखेरचा श्वास घेतला. रविवारी दुपारी आजारी असलेल्या विमलाबाई घरात बेशुद्ध पडल्या. ही बाब लक्षात येताच वहिदा बानो यांनी त्यांना तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या अंत्यसंस्काराला त्यांची गुजरातेतील कन्या पोहोचू शकली नाही. अखेर शेजाऱ्यांनीच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केलेत. धर्मांधांनी घ्यावा आदर्श जाती-धर्माच्या नावावर तेढ निर्माण करून स्वत:ची पोळी भाजणाऱ्या धर्मांधांनी या घटनेचा आदर्श घेण्याची आज नितांत गरज आहे. तळागाळातील, आर्थिक विपन्नावस्थेत जीवन जगणाऱ्यांना जाती-धर्माच्या या भिंतींशी काही देणेघेणे नाही. असे नसते तर अशा ‘वहिदा-विमला’ पाहायला मिळाल्या नसत्या.