शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
2
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
3
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
4
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
5
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
6
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
7
मुंबई-दिल्ली एक्स्प्रेसवेवर भीषण अपघात! धडक होताच उडाला भडका, तीन जणांचा आगीत झाला कोळसा
8
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
9
'बिग बॉस मराठी ६'मध्ये दिसणार गौतमी पाटील? म्हणाली, "शो खूप छान आहे पण..."
10
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
11
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
12
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
13
अग्निवीर आणि अन्य जवान यांच्यामध्ये भेदभाव का होतो?; मुंबई उच्च न्यायालयात याचिका; केंद्र सरकारला हायकोर्टाची नोटीस
14
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
15
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
16
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
17
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
18
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
19
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
20
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांच्या चेहऱ्यावर तिने फुलविले 'स्माइल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 23:21 IST

कुटुंबीयांपासून दुरावलेल्या मनोरुग्ण व निराधारांच्या चेहºयावर हास्य फुलविणारी उच्चशिक्षित निकिता गावंडे ही स्माइल फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायीे ठरले आहे.

ठळक मुद्देस्माइल फाऊंडेशनच्या निकिताद्वारे माणुसकीचे दर्शन

वैभव बाबरेकर ।आॅनलाईन लोकमतअमरावती : कुटुंबीयांपासून दुरावलेल्या मनोरुग्ण व निराधारांच्या चेहºयावर हास्य फुलविणारी उच्चशिक्षित निकिता गावंडे ही स्माइल फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी पार पाडत आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायीे ठरले आहे.साधारण परिस्थितीतून जीवनयात्रा सुरू करणाºया निकिताचा जन्म २५ फेब्रुवारी १९९२ रोजी झाला. तिचे वडील मुकेश वाघ (साईनगर) आॅटो चालवून उदरनिर्वाह करतात. एका आॅटोचालकाची मुलगी जीवनात उत्तुंग भरारी घेईल, याची कल्पनाही निकिताच्या वडिलांना नव्हती. मात्र, शिक्षणात हुशार असलेल्या निकिताने बीएसडब्ल्यू व एसएसडब्ल्यूच्या पदवीसह फॅशन डिझाईनिंगचा कोर्स पूर्ण केला. समाजकार्याचे धडे प्रत्यक्षात उतरविण्याची संधी तिने घेतली. शहरात फिरणारे निराधार व मनोरुग्ण पाहून तिने आपल्या कार्याची, अर्थात या निराधारांच्या पुनर्वसनाची दिशा निश्चित केली. यादरम्यान तिचा परिचय मनोरुग्णांसाठी अहोरात्र झटणारे स्माइल फाऊडेंसनचे अध्यक्ष योगेश मालखरे यांच्याशी झाला. त्यांच्याकडून निकिताने प्रेरणा घेऊन तिने सत्कार्य सुरू केले. समाजाला काही देणे लागते, या दृष्टीने तिने बेवारस व निराधारांचे पुनर्वसनासाठी पाऊल उचलण्याचे ठरविले. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी निकिताचे बलवंत गावंडे यांच्याशी लग्न झाले. त्यांनीही निकिताच्या समाजकार्याला प्रोत्साहनच दिले. त्यामुळे ती पूर्ण जोमाने निराधार व मनोरुग्णांच्या पुनर्वसनाच्या काम करू लागली. अमरावती शहरात वणवण भटकणाºया अनेकांचे निकिता या आधारवड बनल्या आहेत.२८ बेघर मनोरुग्णांना आधारअमरावती जिल्ह्यात फिरून निराधार व मनोरुग्णांचा निकिताने शोध घेतला. आतापर्यंत २८ जणांच्या पुनर्वसनासाठी तिने प्रयत्न केले. आठ जणांना कुटुंबीयांपर्यंत पोहचविले. काहींना वृद्धाश्रमात, काहींना नागपूर येथील माणुसकी निवासात, काही जणांना मनोरुग्णालयात दाखल केले.निकिता विदर्भाची वाघीणनिकिता गावंडेच्या धडाडीच्या नेतृत्वामुळे तिने सहकाºयांची मने जिंकली आहेत. वक्तृत्व कलेची उपासक निकिता बेवारस स्थितीतील नागरिकांना न्याय मिळून देण्यासाठी झटते आहे. तिचे संवगडी निकिताला वाघिणीची उपमा देतात.