शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्काराने शरद पवार सन्मानित, नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रदान

By गजानन उत्तमराव मोहोड | Updated: December 27, 2023 21:19 IST

श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा भाऊसाहेबांच्या नावे पहिला पुरस्कार

अमरावती : श्री शिवाजी शिक्षण संस्थेद्वारा डॉ. भाऊसाहेबांच्या नावे दिला जाणारा पहिला ‘डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार’ देशाचे माजी कृषिमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते बुधवारी प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

अमरावती येथील श्री शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात हा सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख होते. यावेळी खा. नवनीत राणा, आ. सुलभा खोडके, माजी गृहमंत्री तथा आ. अनिल देशमुख, आ. किरण सरनाईक, माजी खासदार अशोकराव मोहोळ, प्रियदर्शन देशमुख, संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले, उपाध्यक्ष गजानन पुंडकर, जयवंतराव पाटील यांसह सदस्य हेमंत देशमुख व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

भाऊसाहेबांच्या प्रयत्नातून एक फार मोठे कार्य विदर्भात उभे झालेले आहे. शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण करण्यामध्ये त्यांनी मोठा वाटा उचलल्याचे गडकरी म्हणाले. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी त्या काळामध्ये जो विचार मांडला तो शेतकऱ्यांच्या सर्वांगीण उन्नतीचा व विकासाचा आणि याकरिता त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समर्पित केले. भाऊसाहेबांच्या नावाने दिला जाणारा पहिला पुरस्कार शरद पवार यांना प्रदान करण्यात आल्याने या पुरस्काराची उंची वाढल्याचे ना. गडकरी म्हणाले.नी केले. कार्यक्रमाला संस्थेचे आजीवन सदस्य, संस्थेचे कर्मचारी विद्यार्थी व शिव परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.------------------------------भाऊसाहेबांच्या नावाने १२५ रुपयांच्या नाण्याचे विमोचनडाॅ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या १२५व्या जयंतीप्रित्यर्थ भारत सरकारच्या वतीने १२५ रुपयांचे नाणे काढण्यात आले आहे. या कार्यक्रमात उपस्थित शिवप्रेमींच्या टाळ्यांच्या कडकडाटात ना. नितीन गडकरी व खासदार शरद पवार यांच्या हस्ते या नाण्यांचे विमोचन करण्यात आले.---------------------------------पुरस्कार राशीच्या व्याजातून महिला शेतकऱ्याचा सन्मानमातोश्री शारदाबाई यांनी शेती करून आम्हा सर्व भावंडांना शिक्षित केले आहे. त्या माऊलीचा आदर्श समाजासमोर राहावा, यासाठी पुरस्काराच्या राशीमध्ये अधिक १५ लाख देणार व यामधून येणाऱ्या व्याजातून महिला शेतकऱ्याचा सन्मान करण्याचे आवाहन खा. शरद पवार यांनी केले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNitin Gadkariनितीन गडकरी