शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

अवैध धंद्यांचे बळी ठरले ‘शांतीलाल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 22:45 IST

जुळ्या शहरातील अवैध धंदे आणि चोरट्यांच्या वाढत्या हिमतीचा एएसआय शांतीलाल पटेल बळी ठरले. दोन्ही शहरांत राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे, गांजाची तस्करी व विक्री आणि वाढत्या चोऱ्यांमुळे शांतीदूत, स्वच्छतादूत म्हणून ओळखल्या जाणारा एएसआय शांतीलाल पटेलचा शहरात राजरोसपणे खून झाला. या घटनेने नागरिकांसह पोलिसांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पण घटनेनंतर हळहळ व्यर्थच.

ठळक मुद्देराग पीएसआयवर, मारले गेले एएसआय : चोरीच्या घटनांमध्ये वाढ

अनिल कडू ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जुळ्या शहरातील अवैध धंदे आणि चोरट्यांच्या वाढत्या हिमतीचा एएसआय शांतीलाल पटेल बळी ठरले. दोन्ही शहरांत राजरोसपणे सुरू असलेले अवैध धंदे, गांजाची तस्करी व विक्री आणि वाढत्या चोऱ्यांमुळे शांतीदूत, स्वच्छतादूत म्हणून ओळखल्या जाणारा एएसआय शांतीलाल पटेलचा शहरात राजरोसपणे खून झाला. या घटनेने नागरिकांसह पोलिसांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. पण घटनेनंतर हळहळ व्यर्थच.शांतीलालच्या मृतदेहावर शासकीय इतमात अंतिम संस्कार पार पडत असतानाच पोलीस शांतीलालला सलामी देत असतानाच चोरट्यांनी नगरसेविकेच्या गळ्यातील सोन्याची चेन पळविली. ३५ ग्राम वजनाची, अंदाजे एक लाखाची चेन जेव्हा चोरट्यांनी पळविली तेव्हा शहरात लहान मोठ्या पोलीस अधिकाºयांसह पोलीस मोठ्या संख्येने शहरात हजर होते. या चोरीच्या घटनेची तक्रार पोलिसात देण्यात आली असून अचलपूर नगरपालिकेच्या नगरसेविका तथा माजी शिक्षण सभापती श्रीमती किरण मालू यांच्यावर हा प्रसंग ओढावला आहे.घटनेच्या रात्री पोलीस उपनिरीक्षक ठाकरे गस्तीवर होत्या. दरम्यान त्यांनी शांतीलालच्या मारेकºयांना हटकले. हटकले म्हणून ते रागावले आणि थोड्या वेळातच त्यांनी त्या पीएसआय मॅडमचा शोध घ्यायला सुरुवात केली. नको ती बडबडही केली. हाती लोखंडी सळाख घेऊन भर रस्त्याने फिरलेत. टपकविण्याची भाषाही ते बोललेत. ही एवढी हिंमत यांच्यात आली कुठून, याचाही शोध पोलिसांना घ्यावा लागेल. खरेतर शांतीलालचा नाहक बळी गेला. परतवाडा ठाण्यात कार्यरत असताना कुठलीही माहिती विचारा, हसत खेळत शांतीलाल दुसºयाचा क्या भाई शांतीलाल गाव मे शांतता है? हा सब कुछ शांत है, असे बोलणारा शांतीलाल आपल्याच मोहल्ल्यात स्वच्छतादूत म्हणून ओळखले जायचे. स्वच्छतेचा पुजारी म्हणून तो ओळखल्या जायचा. अचलपूरहून परतवाड्याकडे पांढरा सदºयावर येताना शांतीलालला मारेकºयांनी थांबवले. ओढाताणीत त्यांचा सदरा निघाला अन् पोलिसांची वर्दी मारेकरºयांच्या नजरेत भरली. पीएसआयवर राग ठेवून टपकवण्याची भाषा वापरणाºया मारेकºयांचा राग अनावर झाला अन् एएसआय शांतीलालला ठार करूनच तो शांत झाला.