वझ्झरच्या बालगृहातील १०० भावंडांत लहानाची मोठी झालेली, शंकरबाबा पापळकरांची लाडाकौतुकाची लेक लाजवंती शनिवार १२ डिसेंबर रोजी बोहल्यावर चढणार आहे. दिग्रसचा श्रीराम तिच्या गळ््यात वरमाला घालणार आहे. या सामाजिक विवाह सोहळ््यात पालकमंत्री संजय राठोड सपत्नीक कन्यादान करणार आहेत. या हृदयस्पर्शी विवाह सोहळ््यासाठी यवतमाळ सज्ज झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील वझ्झर (ता. अचलपूर) येथील अंबादासपंत वैद्य अपंग, मतिमंद, बेवारस बालगृहात वाढलेली शंकरबाबा पापळकरांची १७ वी मानसकन्या लाजवंती आणि दिग्रस येथील दिवंगत वसंतराव सरमोकदम यांचे सुपुत्र श्रीराम यांचा विवाह सोहळा शनिवार १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता यवतमाळच्या डॉ. नंदूरकर विद्यालयात होत आहे. पालकमंत्री करणार कन्यादानअमरावती : सामाजिक दायित्व म्हणून या सोहळ््याचे मुख्य यजमान पालकमंत्री संजय राठोड आणि त्यांची पत्नी शीतल राठोड लाजवंतीचे कन्यादान करणार आहे. असंख्य सहृदयांच्या साक्षीने पार पडणाऱ्या सोहळ््यात प्रसिद्ध गायिका धनश्री देशपांडे यांची सायंकाळी ६ वाजता विवाह सोहळ््यानंतर संगीत रजनी आयोजित केली. या सोहळ््यात शेगावच्या गजानन महाराज संस्थानचे विश्वस्त शिवशंकर पाटील यांच्यावतीने प्रसाद उपलब्ध करून दिला जाणार आहे. या भावपूर्ण सोहळ््याला केंद्रीय रसायने व खते राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते, खासदार भावना गवळी, विचारवंत मा.गो. वैद्य, आमदार बच्चू कडू, आमदार मदन येरावार, आमदार संदीप बाजोरिया, आमदार अशोक उईके, आमदार राजेंद्र नजरधने, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार राजू तोडसाम, जिल्हा परिषद अध्यक्ष आरती फुपाटे, यवतमाळचे नगराध्यक्ष सुभाष राय, अमरावती विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, यवतमाळ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी उपस्थित राहणार आहेत. या विवाह सोहळ््यात पद्मश्री प्रभाकरराव वैद्य, प्राचार्य प्रकाश नंदूरकर, अनंत कौलगीकर, पराग पिंगळे, अरविंद तायडे, विजय कावलकर, नारायण मेहरे, प्रशांत बनगिनवार, सुरेश राठी, जुगल तिवारी, सुरेंद्र भुयार, विवेक बंदुके यांनी पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. (प्रतिनिधी)
शंकरबाबांच्या १७ व्या मुलीचा यवतमाळात विवाह
By admin | Updated: December 11, 2015 00:23 IST