शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

शंकरबाबांना डी.लिट अन् संशोधनात भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2022 05:00 IST

अमरावती विद्यापीठाने अनाथ, अपंगांसाठी आयुष्य झिजवणारे आणि तब्बल १२३ बेवारस मुला-मुलींचे बाप होण्याचे भाग्य असलेल्या शंकरबाबांना डी.लिट उपाधी बहाल करण्याचा निर्णय म्हणजे अमरावती विद्यापीठाच्या इतिहासाला उजळणी देणारा ठरला. विद्यापीठाचे डॉ. संदीप वाघुळे, डॉ. संजय डुडूल, डॉ. अनिता पाटील, डॉ. प्रशांत ठाकरे, डॉ. नीरज घनवटे, कुलगुरू डॉ. दिलीप  मालखेडे यांच्या नावे पेटेंट नोंदविण्यात आल्याने निश्चितच विद्यापीठाच्या गौरवात भर पडली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा हे कोणत्याही शाळेत गेले नाही. मात्र समाजप्रबोधनातून अहोरात्र जागृती त्यांनी केली. म्हणून त्यांच्या नावाने अमरावती विद्यापीठ स्थापन झाले. हे जगातील आगळेवेगळे उदाहरण ठरणारे आहे. दरवर्षी या विद्यापीठातून लाखो विद्यार्थी पदवी घेतात. परंतु, यंदा अनाथाचे नाथ शंकरबाबा पापळकर यांना डी.लिट. उपाधी बहाल करण्यात आली. तसेच विद्यापीठातील नऊ जणांनी पेटेंंट मिळविले. या वैशिष्ट्यपूर्ण घटनेची नोंद करण्यात आली आहे. स्वरसम्राज्ञी आशा भोसले यांच्यानंतर पहिल्यांदाच अचलपूरनजीकच्या वझ्झर येथील स्व. अंबादास पंत वैद्य मतिमंद मूकबधिर बालगृहाचे सर्वेसर्वा अनाथांचे नाथ शंकरबाबा पापळकर यांना अमरावती विद्यापीठाने डी.लिट. उपाधीने सन्मानित केले. अमरावती विद्यापीठाने अनाथ, अपंगांसाठी आयुष्य झिजवणारे आणि तब्बल १२३ बेवारस मुला-मुलींचे बाप होण्याचे भाग्य असलेल्या शंकरबाबांना डी.लिट उपाधी बहाल करण्याचा निर्णय म्हणजे अमरावती विद्यापीठाच्या इतिहासाला उजळणी देणारा ठरला. विद्यापीठाचे डॉ. संदीप वाघुळे, डॉ. संजय डुडूल, डॉ. अनिता पाटील, डॉ. प्रशांत ठाकरे, डॉ. नीरज घनवटे, कुलगुरू डॉ. दिलीप  मालखेडे यांच्या नावे पेटेंट नोंदविण्यात आल्याने निश्चितच विद्यापीठाच्या गौरवात भर पडली आहे. यंदा कार्यकाळ संपल्याने प्र-कुलगुरू डॉ. राजेश जयपूरकर, अधिष्ठाता डॉ. अविनाश मोहरील, डॉ. एफ.सी. रघुवंशी यांना पदमुक्त व्हावे लागले.  डिझॉस्टर मॅनेजमेंट सेल स्थापना, नवीन बंधाऱ्यांची निर्मिती, सौर ऊर्जेसाठी ऊर्जा संवर्धन पुरस्कार विद्यापीठाने पटकावला आहे. व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नामित सदस्य डॉ. दिनेश सूर्यवंशी यांना पदमुक्त करण्यात आले. यंदा डॉ. दिलीप मालखेडे यांच्या  रूपाने अमरावती विद्यापीठाला भूमिपूत्र कुलगुरू मिळाले आहे. 

परीक्षा विभागात आमूलाग्र बदलअमरावती विद्यापीठाने परीक्षा विभागात आमूलाग्र बदल केले आहे. कोरोना संसर्गाची भीती असतानासुद्धा ऑनलाईन परीक्षा, निकाल जाहीर करून विद्यार्थ्यांना दिलासा दिला आहे. पीएचडी पेट ऑनलाईन नोंदणी, संशोधन केंद्र, परीक्षा आवेदन पत्र ऑनलाईन, नामांकन, महाविद्यालयात प्रवेश, परीक्षा अर्ज आदी बाबीदेखील ऑनलाईन करण्यात आल्या आहेत.

 

टॅग्स :Shankarbaba Papalkarशंकरबाबा पापळकर