शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

पुन्हा हादरा, उच्चांकी ५९७ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 05:00 IST

जानेवारीपश्चात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अलर्ट जिल्हा प्रशासनाने दिला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष करणे आता चांगलेच महागात पडू लागले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी दर शनिवार व रविवारी लॉकडाऊन, मार्केट ८ वाजता बंद यासोबतच धार्मिक ठिकाणी केवळ पाच व्यक्तींची उपस्थिती यासारखे कठोर निर्णय जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केले आहेत.

ठळक मुद्देराज्यात सर्वाधिक संक्रमित रुग्ण अमरावतीत, प्रशासन कधी होणार कठोर?

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात सध्या सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद अमरावती जिल्ह्यात होत आहे. ११ महिन्यातील कोरोना संसर्गात गुरुवारी पुन्हा उच्चांकी ५९७ रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्याला कोरोनाचा हादरा बसला आहे. जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या २७,३२३ वर पोहोचली आहे. गुरुवारी १,७९९ नमुुन्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ३३.१८ टक्के अशी पॉझिटिव्हिटीची धक्कादायक नोंद झालेली आहे. जानेवारीपश्चात कोरोनाची दुसरी लाट येण्याचा अलर्ट जिल्हा प्रशासनाने दिला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष करणे आता चांगलेच महागात पडू लागले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी दर शनिवार व रविवारी लॉकडाऊन, मार्केट ८ वाजता बंद यासोबतच धार्मिक ठिकाणी केवळ पाच व्यक्तींची उपस्थिती यासारखे कठोर निर्णय जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी जारी केले आहेत. याशिवाय पथकांद्वारा चौकाचौकांत मास्कचा वापर न करणा-यांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली जात आहे. याशिवाय ५० पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास मंगल कार्यालये, लॉन, सभागृह चालक, मालक यांच्यावर ५० हजारांवर दंडाची कारवाई केली जात आहे.

पाचही झोनमध्ये सुपर स्प्रेडरची नमूने तपासणीपुर्वझोन क्रमांक ३ मध्ये महापालिका क्षेत्रातील व्यापारी वर्गासाठी स्वॅब सेंटरची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. याशिवाय पाचही झोनमध्ये सुपर स्प्रेडर व्यक्तींची स्वॅब तपासणी करण्याचे आदेश आयुक्त प्रशांत रोडे यांनी दिले. त्यांनी झोन क्रमांक ३ ला भेट देऊन सहायक आयुक्त नंदकुमार तिखिले व वैद्यकीय अधिकारी प्रतिभा आत्राम यांच्याशी चर्चा केली.

१०० नमुने जिनोम स्टडीकरीता पुण्यालापुणे येथील राष्ट्रीय विषाणू परीक्षण प्रयोगशाळेला विद्यापीठ लॅबद्वारा मागच्या आठवड्यात पाच नमुने जिनोम स्टडीकरिता पाठविले होते. त्याचा अहवाल अद्याप अप्राप्त असताना गुरुवारी पुन्हा १०० नमुने पाठविल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक श्यामसुंदर निकम यांनी दिली.

गर्दी नको, ज्येष्ठांची काळजी घ्या - मनपा आयुक्तयापूर्वी पॉझिटिव्ह आलेल्या व्यक्तीदेखील पुन्हा पॉझिटिव्ह येत आहेत. त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळा, ५० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्या, बीपी, शुगरसारखे आजार असणा-या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी, राज्यात सध्या सर्वाधिक संक्रमित व्यक्तींची नोंद अमरावतीमध्ये होत आहे. अधिक जनसंपर्क असणा-या व्यक्तींनी व सर्व आस्थापनांमधील सर्व कर्मचा-यांची नमुने चाचणी करावी व त्रिसुत्रीचे पालन करण्याचे आवाहन  महापालिकेचे आयुक्त प्रशांत रोडे यांनी केले.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या