विदर्भात एकमेव : उपाध्यक्षपदी अरूणा वानखडेतिवसा : सहकार क्षेत्रात महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या तिवसा विविध सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदावर काँग्रेसच्या शैला संजय देशमुख यांची अविरोध निवड करण्यात आली आहे, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या अरूणा पांडुरंग वानखडे यांची निवड झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण जाहीर झाले आहे. अनेक ग्रामपंचायतींमध्ये संपूर्ण महिला सदस्य निवडून दिल्याची अनेक उदाहरणे यापूर्वी घडली आहेत. मात्र, सहकारक्षेत्रात अजूनही पुरूषप्रधान संस्कृतीचा बोलबाला आहे. यासर्व प्रतिगामी विचारांना सेवा सहकारी सोेसायटींमध्ये छेद देण्यात आला आहे. सध्या झालेल्या निवडणूक प्रक्रियेत सर्वसामान्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सर्वच म्हणजे १३ ही संचालकपदासाठी महिला उमेदवार अविरोध निवडून आल्यात आहेत. तिवसा तालुका विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठी दोघींनीच अर्ज सादर केले होते. त्यामुळे या दोन्ही पदांची निवडणूक अविरोध पार पडणार, हे निश्चित असताना मंगळवारी हा अंदाज खरा ठरला. अध्यक्षपदावर शैला संजय देशमुख व उपाध्यक्षपदावर अरूणा पांडुरंग वानखडे यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी तिवसा तालुका सेवा संस्थेच्या नवनियुक्त संचालिका बेबी गौरखेडे, सुशीला खाकसे, प्रमिला खुरपेडे, रजनी देशमुख, ज्योती वानखडे, अनिता थूल, रेखा वैद्य, आरती गौरखेडे, स्नेहा देशमुख, वंदना इंगळे आदी संचालक उपस्थित होत्या. त्याचप्रमाणे संजय देशमुख, वैभव वानखडे, नगरसेवक प्रदीप गौरखेडे, अनिल थूल, दिलीप काळबांडे आदींचीही प्रामुख्याने उपस्थिती होती.
विविध कार्यकारी संस्थेच्या अध्यक्षपदी शैला देशमुख
By admin | Updated: October 26, 2016 00:25 IST