शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

शहानूर नदीचे पात्र वळविणार

By admin | Updated: June 21, 2015 00:33 IST

मागील पाच वर्षांपासून तालुक्यातील सुकळी येथे भूस्खलन होत असल्याने अनेक घरांना तडे गेल्यामुळे

भूस्खलन : सुकळी येथे विभागीय आयुक्तांची पाहणीसंदीप मानकर दर्यापूरमागील पाच वर्षांपासून तालुक्यातील सुकळी येथे भूस्खलन होत असल्याने अनेक घरांना तडे गेल्यामुळे शनिवारी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी गावाची पाहणी करुन शहानूर नदीचे पात्र वळविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शनिवारी विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी सुकळी गावाला भेट देऊन भूस्खलनाची पाहणी केली. शहानूर नदी गावानजीक वाहत असल्यामुळे काळ्या मातीला तडे जाऊन मागील वर्षी पाच ते सात नागरिकांची घरे भूस्खलनाच्या तळाख्यात सापडले होते. तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी पाहणी केली होती. शहानूर नदीचे पात्र गावापासून डायव्हर्ट केल्यास भविष्यातील भूस्खलनाचा धोका टळू शकतो, असा अंदाज भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे. दरम्यान भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा उपसंचालक अजय कर्वे, वरिष्ठ भूवैज्ञानिक संजय कराळे, तहसीलदार राहुल तायडे, नायब तहसीलदार राजेश गुरव, शिवसेनेचे बाळासाहेब हिंगणीकर आदी उपस्थित होते.लासूरच्या शेतकऱ्यांची पाहणी, आढावालासूर येथे जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत करण्यात आलेल्या गाव तलावाची विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी पाहणी केली व कामाचे कौतूक केले. आदर्श ग्राम रामागड येथील शेतकऱ्यांशी त्यांनी चर्चा केली. त्यांच्या समवेत तालुका कृषी अधिकारी विनोद लंगोटे, विजय पाटील पवित्रकार व गावातील नागरिक उपस्थित होते.सुकळीला भूस्खलनाचा धोका आहे. भूजल सर्वेक्षण अधिकारी यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली आहे. शहानूर नदीचे पात्र गावापासून डायव्हर्ट करण्याचा प्राथमिक सर्वेक्षण अंदाज आहे. तसा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन पाठविण्यात येईल.- ज्ञानेश्वर राजूरकर,विभागीय आयुक्त, अमरावती.