शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
6
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
7
अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
8
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
9
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
10
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
11
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
12
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
13
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
14
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
15
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
16
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
17
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
18
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
19
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
20
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण

शहीद गोवारी चोविसावा स्मृतिदिन;  दोन तपानंतरही झोळी रिकामीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2018 11:43 IST

 उच्च न्यायालयाने चार महिन्यांपूर्वी गोवारी जमात ही आदिवासी असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला तरी त्याची अंमलबजावणी प्रशासनाने केली नाही.

ठळक मुद्देसरकार कधी उचलणार सकारात्मक पाऊल?

मोहन राऊत/

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती: उच्च न्यायालयाने चार महिन्यांपूर्वी गोवारी जमात ही आदिवासी असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला तरी त्याची अंमलबजावणी प्रशासनाने केली नाही. चोविसाव्या शहीद गोवारी स्मृति दिनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या हक्काच्या सवलतींचा आराखडा राज्यातील ही गोवारी जमात शोधत आहे.२३ नोव्हेंबर १९९४ रोजी गोवारी जमातीला आर्थिक-सामाजिक आरक्षणाच्या मागणीसाठी नागपूर विधानभवनावर धडकलेल्या ११४ निष्पाप गोवारींचे बळी गेले. या घटनेला शुक्रवारी २४ वर्षे पूर्ण होत आहे. यानिमित्त विदर्भाच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने गोवारी बांधव नागपुरात येतात आणि अन्यायाचे स्मरण करून गोवारी स्मारकासमोर श्रद्धांजली वाहतात.दुरुस्ती अध्यादेशाची प्रतिक्षागोवारी जमात आदिवासी असून, गोंडगोवारी ही जमातच अस्तित्वात नाही, असा स्पष्ट निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १४ आॅगस्ट रोजी दिली. राज्य शासनाने त्वरित दुरुस्ती करावी, असे म्हटले. यानंतर आदिवासी गोवारी समन्वय समितीने केंद्र व राज्यातील सत्ताधाऱ्यांशी चर्चा केली. मात्र, चार महिने लोटूनही राज्य शासनाने दुरुस्ती केली नाही. या दुरुस्ती अध्यादेशाची प्रतीक्षा विदर्भातील गोवारी समाज करीत आहे.

टाटाचे सर्वेक्षणनागपूर खंडपीठाचा निकाल येण्यापूर्वी राज्य शासनाने १० जूनला परिपत्रक काढून मुंबईच्या टाटा समाज विज्ञान संस्थेच्या दहा सदस्यीय समितीने गोवारींची परंपरा, संस्कृती या अंगाने गोंदिया ते बुलडाणापर्यंत सर्वेक्षण केले. या समितीचे उपसचिव आपला अहवाल याच महिन्यात सादर करणार आहेत.गरिबीत खितपत पडलेल्या समाजाला पाठबळाची आवश्यकता असताना, शासनाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी केलेली नाही. त्यासाठी १५ डिसेंबरपासून राज्यातील गोवारी समाज लोकशाही पद्धतीने अन्न व देहत्याग आंदोलन करणार आहे.- शालिक नेवारे, राज्य समन्वयक, आदिवासी गोवारी समन्वय समिती, नागपूर

टॅग्स :Governmentसरकार