शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

'सावली'साठी त्या वृद्धाची पायपीट !

By admin | Updated: March 7, 2016 00:04 IST

पायाचे दुखणे घेऊन जीवनाचा गाडा चालविणारा तो वृध्द सावलीच्या शोधात रस्ता ओलांडून दुभाजकावरील वृक्षाचा आसरा घेतो.

परिचर्या वसतिगृहासमोरील प्रकार : कुटुंबाने नाकारले, समाजाने झिडकारले, मग जायचे कुठे ?अमरावती : पायाचे दुखणे घेऊन जीवनाचा गाडा चालविणारा तो वृध्द सावलीच्या शोधात रस्ता ओलांडून दुभाजकावरील वृक्षाचा आसरा घेतो. सायंकाळी उतरते ऊन्ह अंगावर पडताच पुन्हा रस्ता ओलाडून फुटपाथवर जातो, अशी ही त्या वृद्धाची पायपीट दररोजच सुरू असते. इर्विन चौकातील परिचर्या वसतिगृहासमोर हा प्रकार ये-जा करणाऱ्यांना पहायला मिळत आहे. मात्र, आजपर्यंत त्या वृध्दाला आधार देण्याकरिता प्रशासन किंवा सामाजिक संघटना सरसावल्या नाहीत, ही शोकांतिका अमरावती शहरात पाहायला मिळत आहे. पाच वर्षांपासून इर्विन चौकातच भीक मागणारे राजाराम वसंत बोपशेट्टी (६०) हे बुधवारा परिसरात राहत होते. आई-वडिलांच्या छत्रछायेत जगत असताना राजाराम हे घराच्या आवारात पाय घसरून पडले. त्यांच्या कंबरेचे हाड मोडले, तेव्हापासून त्यांच्या जीवन संकटमय झाले. कंबरेचा हाड मोडले होते. मात्र, परिस्थिती गरीब असल्यामुळे त्यांनी इर्विनमध्ये उपचार सुरू केले. मात्र, कंबरेच्या दुखण्यातून त्यांना अखेर कायमचे अपंगत्व आले. त्यातच आई-वडील वारल्यानंतर दु:खांचे दिवस सुरू झाले. तुटक्या घरात राहणार तरी किती दिवस, असा विचार करून राजाराम यांनी पाच वर्षांपूर्वी भीक मागणे सुरू केले. त्यासाठी इर्विन चौक हा वर्दळीचे ठिकाण त्यांनी निवडले. इर्विन चौकातील अन्नकुटावर जीवनाचा प्रवास सुरू केला. जेवण मिळाले मात्र, छत नाही, छत नाही तर सावली कशी मिळणार, अशी स्थिती राजाराम यांच्यासमोर निर्माण झाली. मात्र, त्याचाही जालीम उपाय त्यांनी शोधला. सकाळी ऊन्ह पडल्यावर दुभाजकावरील वृक्षांची सावली रस्त्यावर पडते. त्यामुळे राजाराम हे पाय घासत हाताच्या साह्याने रस्ता ओलांडून दुभाजकाजवळ जातात, तेथील वृक्षांच्या सावलीत बसतात किंवा कधीकाळी झोपतातदेखील. मात्र, सायंकाळी मावळत्या सूर्याची किरणे अंगावर पडताच पुन्हा रस्ता पाय घासत हाताच्या बळावर पुन्हा रस्ता ओलांडून परिचर्या वसतिगृहासमोरील फुटपाथवर येतात. दरम्यान, त्यांचे जेवण आणून देण्यासाठी एक महिला वृध्द भिकारीसुध्दा सोबतीला असते. ती वृध्दा जालना येथील असल्याचे सांगत असून ती आपले नाव मीरा महाजन सांगते. राजाराम व मीरा हे दोघेही संगतीने जेवणसुध्दा करतात. (प्रतिनिधी) या निराधार वृद्धांची जबाबदारी कुणाची ?अमरावतीची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू असताना निराधारांना आधार देणार कोणी नाही. प्रशासन विकास कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करतात, त्यातच सामाजिक दायित्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या संस्था विविध उपक्रमांद्वारे निराधारांचे पुनर्वसनसुध्दा करतात. मात्र, शहरात विविध ठिकाणी भीक मागणाऱ्या निराधार वृध्दाकडे कोणी का लक्ष पुरवित नाही, हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.