लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : रक्त तपासणीसाठी आल्याची बतावणी करून हॉस्पिटलमधील नर्सवरच लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना चांदणी चौकातील नोमान हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी घडली. याप्रकरणी नागपुरी गेट पोलिसांनी शेख मोहसीन शेख मुजीब (२४, रा. गुलिस्ता नगर) याला अटक केली.नागपुरी गेट हद्दीतील महिला डॉ. नोमान हॉस्पिटलमध्ये काम करते. शुक्रवारी आरोपी शेख मोहसीन हॉस्पिटलमध्ये आला आणि त्याने रक्त तपासायचे असल्याचे पीडित नर्सला सांगितले. नर्सने शेख मोहसीनला रक्त तपासणी विभागात नेले. दरम्यान, रक्त तपासणीसाठी सिरींज आणण्याकरिता महिलेने पाठ फिरविताच शेख मोहसीनने दाराचा कडीकोंडा लावून घेतला आणि नर्सचे तोंड दाबून तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप नर्सने नागपुरी गेट पोलिसांना दिलेल्या तक्रारीतून केला आहे.नागपुरी गेट पोलिसांनी शेख मोहसीनविरुद्ध भादंविच्या कलम ३७६, ५०६ अन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश खुळे करीत आहेत.
परिचारिके वर लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2017 01:02 IST
रक्त तपासणीसाठी आल्याची बतावणी करून हॉस्पिटलमधील नर्सवरच लैंगिक अत्याचार करण्यात आला. ही घटना चांदणी चौकातील नोमान हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी घडली.
परिचारिके वर लैंगिक अत्याचार
ठळक मुद्देआरोपीला अटक : चांदणी चौकातील हॉस्पिटलमधील घटना