आरोपी अटकेत : २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी वरूड : दोन अल्पवयीन मुलींना प्रेमजाळात अडकविल्यांनतर त्यांच्यावर शहरातील अर्धवट बांधकाम केलेल्या घरात अतिप्रसंग केल्याची घटना १७ डिसेंबर गुरुवारच्या मध्यरात्री घडली. पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून वरुड पोलिसांनी याप्रकरणी बाललैंंगिक अत्याचार तसेच अतिप्रसंगाचा गुन्हा दाखल करून अटक केली. आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अतिप्रसंग करणाऱ्या आरोपीचे नाव संजय प्रभाकर घोरपडे (२४, रा. व्यंकटेशनगर, जायन्टस चौकामागे वरुड) असे आहे. सदर भामट्याने शहरातीलच एका १७ वर्षीय बालिकेला प्रेमजाळ्यात अडकविले होते. सदर १७ वर्षीय मुलीने शेजारच्या १४ वर्षीय बालिकेसोबत ओळख करून दिली. यानुसार पारडसिंगा येथे जाण्याचा बेत आखण्यात आला. गुरुवार १७ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता जायचे ठरवून स्थानिक सती चौक परिसरात भेटण्याचे ठरले. दोन्ही मुली वेळेवर पोहोचल्या. परंतु सदर भामटा उशिरा आल्याने गव्हाणकुंडला जाण्याचे ठरविले.यानुसार दोघींना घेऊन गव्हाणकुंडला गेले सायंकाळी तेथून परतल्यांनतर लहान मुलीच्या बहिणीने विचारपूस केली. यानंतर पुन्हा सदर विवाहित तरुणाला साईमंदिर वरुड येथे बोलावण्यात येऊन रात्री तेथे तिघांनी नाश्ता केला. आणि रात्री उशिरा १२ वाजताचे दरम्यान एका अर्धवट बांधकाम केलेल्या घरामध्ये सुरुवातीला लहान मुलीला घेऊन तर नंतर काही वेळाने दुसऱ्या १७ वर्षीय मुलीला घेऊन अतिप्रसंग केल्याची घटना घडली. रात्री उशीर झाल्याने घरी जायचे नाही म्हणून दोघींना इसंब्री येथे १४ वर्षीय मुलीच्या मामाकडे रात्रीच पोहोचवून दिले. परंतु मामाने दुसऱ्या दिवशी सकाळी दोघींना थेट पोलीस ठाण्यात आणले आणि १४ वर्षीय मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली. सुरुवातीला फूस लावून पळवून नेण्याचा भादंविचे कलम ३६३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. अधिक चौकशीमध्ये यावरून ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनात एपीआय चित्तरंजन चांदुरे यांनी इनकॅमेरा दोघींचे बयान नोंदवून वैद्यकीय तपासणी केली. यावरून विवाहित तरुण संजय प्रभाकर घोरपडे २४ याच्याविरुध्द भादंविचे कलम ३७६, बाललंैगिक अत्याचार संरक्षण कायदा कलम ४ अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आरोपीला अमरावतीच्या विशेष न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची २२ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप गवई, ठाणेदार अर्जुन ठोसरे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक चित्तरंजन चांदुरे, उपनिरीक्षक श्रीराव, गोपाल सोळंके, शिवपाल दाबेराव, योगेश देशमुख, सुरेश गावंडे करीत आहेत. (तालुका प्रतिनिधी)
दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार !
By admin | Updated: December 21, 2015 00:12 IST