भीषण आग... अचलपूर पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या जुन्या इमारतीला गुरुवारी रात्री ८ वाजता अचानक आग लागली. यात इमारतीतील दस्तऐवजांची पूर्णत: राखरांगोळी झाली. यात ५ लाखांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग विझविण्यासाठी दोन बंबांना पाचारण्यात करण्यात आले होते. दीड तासांनी आग आटोक्यात आली मात्र आगीचे कारण कळले नाही.
भीषण आग...
By admin | Updated: April 8, 2016 00:09 IST