शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

सात महिन्यांची प्रतीक्षा, 17 दिवस गट्टी, पुन्हा सुट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 05:00 IST

शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दीड शतकी मजल गाठल्यानंतर २००-३०० च्या घरात कोरोनाग्रस्तांचे निदान झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व शाळा २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णयावर महापौरांनी शुक्रवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब केला. मात्र, तो निर्णय पालकांपर्यंत न गेल्याने त्यांच्या मागे लागून अनेक मुले शाळेत दाखल झाली. पण, प्रशासनाचा निर्णय कळविण्यासाठी फाटकापुढे तैनात करण्यात आलेल्या शिक्षकांनी त्यांना परतविले.

ठळक मुद्देदहावी, बारावी सोडून सर्व शाळांचे वर्ग बंद, विद्यार्थ्यांना ऐनवेळी परतावे लागले, २८ फेब्रुवारीनंतर मोबाईलवर कळविणार अपडेट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सात महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर २३ जानेवारीपासून पाचवीपासून पुढील शाळा सुरू झाल्या. प्राथमिक शाळेतून माध्यमिक वर्गात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांची नावे वहीत लिहून घेतली. पुढील वर्गातील जुने सवंगडी पुन्हा एकत्र आले. जेमतेम १७ दिवस होत नाही तोच शनिवारी त्यांना शाळेच्या फाटकातून परतविले गेले अन् मित्र दूर जाणार, या जाणिवेतून मन खट्टू झाले.शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. दीड शतकी मजल गाठल्यानंतर २००-३०० च्या घरात कोरोनाग्रस्तांचे निदान झाले आहे. त्यामुळे महापालिकेच्या सर्व शाळा २८ फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याच्या निर्णयावर महापौरांनी शुक्रवारच्या बैठकीत शिक्कामोर्तब केला. मात्र, तो निर्णय पालकांपर्यंत न गेल्याने त्यांच्या मागे लागून अनेक मुले शाळेत दाखल झाली. पण, प्रशासनाचा निर्णय कळविण्यासाठी फाटकापुढे तैनात करण्यात आलेल्या शिक्षकांनी त्यांना परतविले. काही दिवसांच्या शाळेत दोस्ती जमलेल्या मुलांना आपल्या चिमुकल्या सोबत्याला भेटायचे होते. त्याच्याशी फिजिकल डिस्टन्सिंग ठेवूनच का होईना, बोलायचे होते. शिक्षकांना अभ्यास दाखवायचा होता.  कोरोनाकाळात झालेले अभ्यासाचे नुकसान काही प्रमाणात भरून निघेल, या अपेक्षाने पालकांनी मोठा धोका पत्करून पाल्यांना शाळेत पाठविले. मात्र, कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने सर्व पुन्हा दप्तरबंद झाले आहे.घरी परतणा-या विद्यार्थ्यांची गर्दी शनिवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास वडाळीच्या मनपा शाळा क्रमांक १४ येथे दृष्टीस पडली. शाळा २८ फेब्रुवारीपर्यंत बंद असल्याचे सांगण्याची जबाबदारी येथे वर्गशिक्षक असलेल्या दिव्यांग शिक्षिका ज्योत्स्ना खडसे यांनी पार पाडली. याशिवाय सूचना फलकही लावले होते. वडाळी येथील महापालिका शाळेत ३५ मुले आली होती.

शहरात ४२ शाळा, ६ हजार विद्यार्थीअमरावती महापालिकेंतर्गत शहरात ५० शाळा असून, ९५०० विद्यार्थी संख्या आहे. यामध्ये इयत्ता पाचवी ते आठवीच्या ४२ शाळा असून, ६ हजारांवर विद्यार्थिसंख्या आहे. 

मुले नियमित शाळेत यायला सुरुवात झाली होती. मुलांना शिकवणीची गोडी लागली असतानाच पुन्हा वाढत्या कोरोनामुळे शाळा बंदचा निर्णय धडकल्याने आता ऑनलाईन अभ्यासाक़डे वळावे लागेल.- योगेश पखाले, मुख्याध्यापक

शिक्षकांचा मेसेज शुक्रवारी सायंकाळी प्राप्त झाल्याने मुलाला शाळेत पाठविले नाही. पण, शाळा बंदच्या निर्णयाने दु:ख झाले. माझा मुलगा सातवीत शिकतो. आम्ही रोज कामात व्यस्त राहत असल्याने त्याचा अभ्यास घेऊ शकत नाही. - प्रतिभा मोहोड, पालक, वडाळी.

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या