शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणधारकांना सात दिवसांचा अल्टिमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2022 00:02 IST

भारतातील सहाव्या क्रमांकाच्या अमरावती - नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले, तेव्हा येथे राष्ट्रसंतांच्या महासमाधीसमोरून बंदिस्त उड्डाणपूल प्रस्तावित होता. परंतु, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे व आश्रमाचे  महात्म्य लक्षात घेता, त्यावेळी स्थानिक नागरिक व गुरूदेवभक्तांनी बंदिस्त उड्डाणपुलाला तीव्र विरोध करून खुल्या उड्डाणपुलाची मागणी केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : गुरूकुंज मोझरी येथे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या अतिक्रमणाने चार दिवसांपूर्वी एका भावी डॉक्टरचा बळी घेतला होता. त्यामुळे येथील बेकायदेशीर अतिक्रमणाचे प्रकरण चांगलेच तापले. विविध राजकीय पक्ष, संघटना व स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने अवैध अतिक्रमण हटविण्याची मागणी केली व तसे न केल्यास महामार्गावर रास्तारोको आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला होता. त्याची दखल घेत भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने मंगळवारी संबंधित अवैध अतिक्रमणधारकांना अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस बजावली आहे.भारतातील सहाव्या क्रमांकाच्या अमरावती - नागपूर राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले, तेव्हा येथे राष्ट्रसंतांच्या महासमाधीसमोरून बंदिस्त उड्डाणपूल प्रस्तावित होता. परंतु, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे व आश्रमाचे  महात्म्य लक्षात घेता, त्यावेळी स्थानिक नागरिक व गुरूदेवभक्तांनी बंदिस्त उड्डाणपुलाला तीव्र विरोध करून खुल्या उड्डाणपुलाची मागणी केली होती. त्यामुळे उड्डाणपुलाला पर्यायी व्यवस्था म्हणून याच महामार्गावरून सहा किलोमीटर अंतराचा बायपास रस्ता मंजूर करण्यात आला. त्याची कायदेशीर प्रक्रिया पार पाडून जेमतेम या बायपासच्या कामाला सुरूवात झाली  असून, येत्या काही दिवसात हा मार्ग वाहतुकीसाठी पर्याय ठरणार आहे.दरम्यान, सध्या येथील महामार्गावर दोन्ही बाजूंनी झालेल्या अतिक्रमणाने वाहतुकीची चांगलीच कोंडी निर्माण झाली आहे. शंभर मीटर अंतरावर पादचारी मार्गच तयार करण्यात आला नसल्यामुळे पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची महासमाधी, श्रीगुरूदेव महाविद्यालय व आयुर्वेद रुग्णालय हे एकाच मार्गावर आणि अगदी हाकेच्या अंतरावर  असल्यामुळे येथे विद्यार्थी, भाविक व रुग्णांची सदैव रेलचेल असते. शनिवारी झालेल्या अपघातात भावेश जगनाडे या विद्यार्थ्याचा मृत्यू समाजमनाला चटका लावून गेला. त्यामुळे ‘अतिक्रमण हटाव’चा नारा देण्यात येत आहे. त्याची दखल भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने घेतली. येत्या सात दिवसात अतिक्रमण हटवावे, अन्यथा राष्ट्रीय महामार्ग जमीन व वाहतूक कायदा २००२ कारवाईचा इशारा अतिक्रमणधारकांना देण्यात आला आहे.

 

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमण