शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

विनाअनुदानित शिक्षकांच्या प्रश्नांवर सोमवारी तोडगा !

By admin | Updated: June 13, 2016 01:43 IST

गत १२ दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला रविवारी ...

गृहराज्यमंत्र्यांची माहिती : मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार अमरावती : गत १२ दिवसांपासून विनाअनुदानित शिक्षकांचे विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला रविवारी राज्याचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी भेट दिली. सोमवारी मुख्यमंत्री, शिक्षणमंत्री यांच्यासोबत संयुक्त बैठक घेऊन अनुदानाबाबत तोडगा काढण्याचा शब्द ना. पाटील यांनी दिला.ना. रणजित पाटील हे रविवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास येथील शिक्षण उपासंचालक कार्यालय परिसरात सुरू असलेल्या विनाअनुदानित शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या बेमुदत उपोषणस्थळी पोहचले. ना.पाटील यांनी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक असून काही तांत्रिक बाबी पूर्ण होताच अनुदानासंदर्भात शासन निर्णय निर्गमित होणार असल्याचे ना. पाटील म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी विनाअनुदानित शाळा शिक्षकांच्या अनुदानाचा विषय मार्गी लावण्यासाठी तिजोरीत जमा शिल्लक असलेल्या अनुदानित शाळांच्या निधीतून देण्याची तयारी दर्शविली आहे. हा निधी वळता करताना काही तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी कालावधी लागत असल्याचे ना. पाटील यांनी सांगितले. औरंगाबाद विभागातील गजानन खरात या शिक्षकांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. ही बाब दुर्देवी असून सोमवारी मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असा शब्द ना. पाटील यांनी दिला. यावेळी शिक्षक महासंघाचे शेखर भोयर, कृती समितीचे पुंडलिकराव रहाटे, सुरेश सिरसाट, सुधाकर वाहुरवाघ, गोपाल चव्हाण, आर. जी. पठाण, एन. आर. पठाण, पी. एच. खडसे, विजय कळस्कर व पदाधिकारी यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)