शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

उष्मघाताच्या रुग्णांसाठी इर्विनमध्ये दोन स्वतंत्र वार्डची व्यवस्था

By उज्वल भालेकर | Updated: April 20, 2023 19:41 IST

उन्हाचा तडाखा वाढला : आरोग्य प्रशासन सतर्क, नागरिकांना आवाहन

अमरावती : जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून, दुपारच्या सुमारास घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे. जिल्ह्यातील तापमान हे ४३ अंशांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हामध्ये उष्माघाताचा त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा आरोग्य प्रशासन सतर्क असून, जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघाताच्या रुग्णांसाठी दोन वाॅर्डात स्वतंत्र व्यवस्था करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.

राज्यात सूर्य सर्वत्रच आग ओकत आहे. अशातच नुकताच पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात भरउन्हात हजेरी लावलेल्या सहाशेच्या जवळपास नागरिकांना उष्माघाताचा त्रास, तर १२ नागरिकांचा मृत्यू देखील झाला. त्यामुळे उष्माघातापासून बचावासाठी त्वरित उपाय योजना आवश्यक आहे. माणसाच्या शरीरामध्ये नॉर्मल तापमान हे ३७ अंश डिग्री सेल्सिअस इतके असते. त्यामुळे शरीरातील तापमान यापेक्षा जास्त वाढले तर घाम येतो आणि शरीर थंड होण्याची प्रक्रिया सुरू होते. शरीरातील पाणी संपले तर घाम येणे बंद होऊन तोंडाला कोरडा पडून उष्माघाताची शक्यता वाढते. त्यामुळे उन्हामध्ये बाहेर पडताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयात उष्माघाताच्या महिला रुग्णांसाठी वाॅर्ड क्रमांक एक, तर पुरुष रुग्णांसाठी वाॅर्ड क्र. आठमध्ये स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.उष्माघातापासून अशी घ्या काळजी

उष्माघात होऊ नये यासाठी विशेष कळजी घेणे गरजचे आहे. यामध्ये वाढत्या उन्हामध्ये कष्टाची कामे करणे टाळावी, उष्णता शोषून घेणारे कपडे घालावेत, उन्हामध्ये शेतावर अथवा इतर मजुरीची कामे फार वेळ करू नये, भरपूर प्रमाणात पाणी प्यावे, घराबाहेर पडताना छत्री, टाेपी किंवा चेहऱ्यावर कपडा बांधावा, अशक्तपणा असेल तर त्वरित डॉक्टरांना दाखवावे.उन्हाचा वाढता तडाखा लक्षात घेता, जिल्हा सामान्य रुग्णालयात वाॅर्ड एक व आठमध्ये उष्माघाताच्या रुग्णांसाठी व्यवस्था केली आहे. तसेच उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयातही उष्माघाताच्या रुग्णांसाठी प्रत्येकी दोन बेडची व्यवस्था केली आहे. जिल्ह्यात सध्यातरी उष्माघाताचा एकही रुग्ण आढळलेला नाही.-डॉ. दिलीप सौंदळे, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :AmravatiअमरावतीHeat Strokeउष्माघात