शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

साश्रृनयनांनी निरोप

By admin | Updated: July 22, 2016 00:05 IST

ट्रकचालकाच्या बेदरकारपणाचे बळी ठरलेल्या इंगळे कुटुंबातील तिघांवर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अंतिमसंस्कार करण्यात आले.

समाजमन द्रवले : हजारो नागरिकांनी वाहिली श्रद्धांजली सुमित हरकुट चांदूरबाजार ट्रकचालकाच्या बेदरकारपणाचे बळी ठरलेल्या इंगळे कुटुंबातील तिघांवर गुरुवारी सायंकाळच्या सुमारास अंतिमसंस्कार करण्यात आले. किशोर इंगळे, त्यांच्या पत्नी शिल्पा आणि लहानग्या शौर्यचे कलेवर पाहून अनेकांना हुंदका आवरता आला नाही.एका क्षणात आई-वडीलांची वाट बघत असलेला सुजल अनाथ झाला. व त्याच्या वृध्द आजीवर तिघांचे निर्जिव पार्थिव डोळ्यात साठविण्याची दुदैवी वेळ आली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हळहळला. गुरुवारी सायंकाळी ७ च्या सुमारास निघालेल्या अंत्ययात्रेत पाच हजारांहून अधिक नागरिक सहभागी झाले होते. शहरातच नव्हे तर संपूर्ण तालुक्यात सामाजिक सेवेमध्ये सहभागी असलेले किशोर इंगळे यांना अपरिचित असलेला माणूस विरळच. सहकारी वृत्ती व मृदू स्वभावामुळे प्रत्येकाला हवाहवासा वाटणाऱ्या या व्यक्तिवर व त्यांच्या कुटूंबावर बेधुंद ट्रकचालकाने घाला घातला, यावर क्षणभर कुणाचाही विश्वास बसला नाही. त्यामुळे हजारो नागरिकांनी मिळेल त्या वाहनांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरील परिस्थिती पाहून जनतेचा संतापाचा उद्रेक झाला. सकाळपासून आपल्या आई-वडीलांची, छोट्या भावाची प्रतीक्षा करीत असलेल्या सुजलला अपघाताबद्दल काहीच माहिती नव्हते. आई आल्यानंतर तिच्यासोबतच जेवणाचा आग्रह सुजलने धरला. अखेर आईवडीलांविना सुजल उपाशी झोपून गेला. सकाळी उठल्यानंतर आईवडीलांसह छोटा शौर्य मृत झाल्याचे त्याला कळले. अवघ्या १० वर्षीय सुजलने त्यावेळी हंंबरडा फोडला. अश्रूंना वाट मोकळी करुन दिली. तसेच एकुलत्या एक मुलाला, सुनेला व चिमुरड्या नातवाचे पार्थिव पाहताच वृद्ध आईला दु:ख अनावर झाले. सोबत दोन्ही बहिणींनाही भावासह त्याचे सर्व कुटुंब एका झटक्यात जगाचा निरोप घेवून गेल्याचे दु:ख आवरता आले नाही. इंगळे कुटूंबातील परिजनांची करुण अवस्था उपस्थित हजारो नागरिकांचे डोळे पानावून गेली. सायंकाळी ६ च्या सुमारास मोर्शी रोडवरील हिंदुस्मशानभूमि मार्गाने अंत्ययात्रा निघाली. यावेळी चांदूरबाजारसह पंचक्रोशी उलटली होती. स्मशानभूमित भोवळ आणि मृत्यूही हृदयाला हेलावून टाकणारा हा प्रसंग पाहून संजय पंजाबी नामक युवकाला स्मशानभूमितच भोवळ आली. त्यामुळे त्याला राहत्या घरी पाठविण्यात आले. तथापि घरी गेल्यानंतर त्यांचा तीव्र हृदयविकाराने मृत्यू झाला.