शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

घाटवळणातून अपघाताची मालिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:15 IST

घाटवळणात ओव्हरलोड ट्रक, अपघाताची मालिकाच फोटो पी ०६ जावरे ॲक्सिडंट लोकमत विशेष फोटो कॅप्शन (शनिवारी घटांग सेमाडोह नजीक घोडगी ...

घाटवळणात ओव्हरलोड ट्रक, अपघाताची मालिकाच

फोटो पी ०६ जावरे ॲक्सिडंट

लोकमत विशेष

फोटो कॅप्शन (शनिवारी घटांग सेमाडोह नजीक घोडगी पुलानजीक रस्त्याच्या कडेला कोसळलेला ओव्हरलोड ट्रक )

नरेंद्र जावरे-परतवाडा : परतवाडा - धारणी - इंदूर या महाराष्ट्र-मध्यप्रदेश आंतरराज्य वाहतूक करणाऱ्या मालवाहू ट्रक रविवारी घटांग ते सेमाडोह मार्गावरील घोडगी पुलानजीक घाटवळणावर रस्त्याच्या कडेला कोसळला. मध्यप्रदेशातून ओव्हरलोड ट्रकचा अपघात होणे नित्याचीच बाब झाली आहे. परंतु, आरटीओ विभागाचे दुर्लक्ष हप्ताखोरीमुळे सुरू असल्याचा आरोप आहे. या अपघाताच्या मालिकांचा धोका इतर प्रवासी वाहनांना होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे.

परतवाडा, घटांग, सेमाडोह, धारणी, खंडवा, इंदूर, असा हा मध्यप्रदेशात जाणारा आंतरराज्यीय महामार्ग आहे. हरिसाल, सेमाडोह ते परतवाडानजीकच्या बुरडघाटपर्यंत किमान ६० किलोमीटर अंतरात घाटवळण आहे. या मार्गावर रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात जडवाहतूक करणारे ट्रक धावतात. वर्षभरात अनेकदा ट्रक अपघाताच्या घटना घडत आहेत. त्याच्या मागील कारणांचा शोध घेतला असता, अनेक धक्कादायक बाबी पुढे आल्या असून, आरटीओसह व्याघ्र प्रकल्प आदी विभाग या अपघाताला कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास येत आहे.

बॉक्स

अरुंद रस्ते, रुंद करण्याची परवानगी नाही

परतवाडा ते धारणीपर्यंत शंभर किलोमीटर अंतरावर अनेक ठिकाणी घाटवळण आहे. हा संपूर्ण मार्ग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. रस्त्याची रुंदी साडेपाच मीटर आहे. वळणावर सात मीटर व्हायला पाहिजे. परंतु वळणावरसुद्धा एकसारखीच रुंदी असल्याने चालकांना मोठे वाहन वळविताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे वास्तव आहे. वळणावर रस्ता रुंदीकरणासाठी व्याघ्र प्रकल्पाची परवानगी मिळत नसल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग हतबल आहे.

बॉक्स

ओव्हरलोड ट्रक, आरटीओ गप्प का?

परतवाडा ते इंदूर मार्गावर मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड ट्रक वाहतूक होते. हा सर्व प्रकार घाटवळणातून ट्रकला वारंवार होणाऱ्या अपघातातून उघड झाला असताना संबंधित आरटीओ विभागाने त्यावर मौन धारण केल्याचे चित्र आहे. बुरडघाटनजीक आरटीओचा तपासणी नाका आहे. त्यावर कुठल्या ट्रकवर कारवाई केली जाते, हे मात्र गुलदस्त्यात आहे.

बॉक्स

घोडगी पुलानजीक ओव्हरलोड ट्रक कोसळला

रविवारी सकाळी १० वाजता दरम्यान घटांगपासून १० किलोमीटर अंतरावर ते सेमाडोह मार्गावरील घोडगी पूल आहे. त्याजवळ एमपी ०९ एच ९६७० क्रमांकाचा परतवाडाकडे जाणारा मालवाहू ओव्हरलोड ट्रक रस्त्याच्या कडेला कोसळला. विरुद्ध दिशेने प्रवासी बस आल्यामुळे ट्रकचालक अनियंत्रित झाल्याने अपघात घडल्याची माहिती आहे. या अपघातामुळे ट्रक रस्त्यावरच आडवा झाल्याने काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.

कोट

शनिवारी घटांग सेमाडोह मार्गावर ट्रक कोसळल्याची कुठल्याच प्रकारची नोंद पोलिसात नाही. अपघातग्रस्त ट्रक परस्पर नेला का त्याचे कारण यासंदर्भात माहिती घेतली जात आहे.

- राहुल वाढीवे,

ठाणेदार, चिखलदरा

कोट

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत रस्ते आहे. ओव्हरलोड हे कारण असले तरी रस्त्याची वळणावरील रस्तारुंदी एवढीच आहे. व्याघ्र प्रकल्पाची परवानगी मिळत नसल्याने वळण मार्ग अरुंद करता येत नाही.

चंद्रकांत मेहत्रे

कार्यकारी अभियंता

सा बां विभाग अचलपूर

060721\img-20210705-wa0005.jpg

रस्त्यावर अपघातग्रस्त ट्रक