*खरिपाचा भारउचलणार तरी कसा?*
आसेगावपूर्णा/किशोर मोकलकर
कोरोना संकटामुळे नागरिक संकटाचा सामना करत आहेत.त्यातच शेतकरी सातत्याने विविध संकटांच्या मालिकेने त्रस्त झाला आहे. त्यामुळे पेरणीपूर्व मशागत करूनही खरीप हंगामाची पेरणी कशी करायची?अशा आर्थिक चणचणीत शेतकरी सापडला असल्याचे चित्र आहे.
चांदूर बाजार तालुक्यातील आसेगाव पूर्णासह परिसरातील शेतकऱ्यांना कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागतो. या संकटातून सावरतांना अवकाळी पावसाचा तडाखाही सन करावा लागत आहे. आता तर काेरोणामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे खरीप तसेच रब्बी हंगामातील पिके कशी पिकवावीत,हा प्रश्न पडला आहे. त्यातच पावसाळा येऊन ठेपल्याने शेतकरी सर्व संकट विसरून शेती मशागतीच्या कामाला लागला आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांना आर्थिक चिंताही सतावत आहे. खरीप पेरणीसाठी खर्च कसा करायचा,असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
तालुक्यातील शेतकरी निसर्ग पावसावर शेती फुलवितो. परंतु,अल्प पाऊस,अतिवृष्टी,गारपीट आदीचा सामना करताना मेटाकुटीला येतो. त्यामुळे शेतकरी सदन होत नाही. लॉगडाऊनमुळे कष्टाने शेतात वाढवलेले टरबूज,काकडी, खरबूज,संत्रा,टोमॅटो,
पालेभाज्या आदी पिकांची विक्री करण्यासाठी अनंत अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे उभी पिके शेतात सडली.त्यात पुन्हा अवकाळी, गारपिटीचा मारा सहन करावा लागला. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. त्यामुळे आता खरिपाची पेरणी कशी करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.
-------- -----------
*बियाणांचा खरेदीसाठीचा प्रश्न गंभीर*
यावर्षी शेतकऱ्यांकडे पैसे शिल्लक नसल्याने येणाऱ्या खरीप हंगामाची व्यवस्था करण्याचे आव्हान शेतकऱयांसमोर आहे.
कृषी केंद्र चालकांची मागील वर्षाची उधारी अद्यापही शेतकरी देऊ शकला नाहीत.आता या खरिपासाठी बी-बियाणे कुठून आणावे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
===>>>===
गेल्या वर्षी सोयाबीन,
तूर,कपाशीची पेरणी साधली नाही.थोडं काही जे काही पिकले ते लाँकडाऊनमध्ये खाण्यात गेले. जवळचा पैसा सर्व निघुन गेला.आता पेरणीची व्यवस्था कशी करावी हा प्रश्न समोर उभा आहे.
मनोहर गवई शेतकरी
अासेगाव पूर्णा