लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : तालुक्यात दिवसोंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता तहसील कार्यालयातर्फे लोकसहभागातून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीत विलगीकरण कक्ष येथील नागरिकांच्या लोकसहभागातून उभारण्यात आल्याने जिल्ह्यासाठी एक मॉडेल तयार झाले आहे.तालुक्यासह जिल्ह्यात कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत असलेला संसर्ग पाहता प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रत्येक तालुकास्तरावर कोविड रुग्णालय, विलीगीकरण कक्षसुद्धा उभारण्यात येत आहे. याकरिता चांदूर बाजार तालुक्याकरिता १०० टक्के लोकसहभागातून विलगीकरण कक्ष उभारले आहे. तालुक्याकरिता ग्रामीण रुग्णालयाच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीत कोविड रुग्णालयाची आधीच सुविधा सुरू करण्यात आली आहे. मात्र, हायरिस्क रुग्णाची संख्या अधिक असल्याने मोठ्या प्रमाणात विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे.तालुक्यात मंडळनिहाय विलगीकरण कक्ष उभारले असून, चांदूर बाजार शहरात औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची इमारत व समाज कल्याण वसतिगृहची इमारत विलगीकरण कक्षकरिता सुसज्ज ठेवण्यात आली आहे. याकरिता चांदूर बाजारातील निरनिराळ्या संघटनांनी पुढाकार घेतला आहे. यामध्ये पेट्रोल पंप संघटना, तालुका कृषी केंद्र व कृषी साहित्य विक्रेत्या संघ, गो. सी. टोम्पे महाविद्यालय, साई नगरी ले-आऊट आदी संघटनांनी आर्थिक मदत केली आहे. याकरिता तहसीलदार अभिजित जगताप यांच्या संकल्पनेतून १०० खाटांचे विलगीकरण कक्ष उभे झाले आहे. या इमारतीत १०० पलंग, गादी, चादरची व्यवस्था झाल्याने येथे हायरिस्क व्यक्तींना ठेवण्यात येणार आहे. पुढील टप्प्यात आणखी १०० खाटांची व्यवस्था केली जाणार असून, एकूण २०० खाटांची व्यवस्था करण्यात येणार आहे. तहसीलदार अभिजित जगताप यांनी लोकसहभागातून उभारलेले हे विलगीकरण कक्ष जिल्ह्यासाठी एक मॉडेल ठरले आहे. नागरिकांनी नागरिकांसाठी उभारलेले पहिले विलीगिकरण कक्ष चांदूर बाजार तालुक्यात सुरू झाल्याने ही जिल्ह्यासाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे.
लोकसहभागातून विलगीकरण कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2020 05:01 IST
तालुक्यासह जिल्ह्यात कोरोनाचा दिवसेंदिवस वाढत असलेला संसर्ग पाहता प्रशासनाने कंबर कसली आहे. प्रत्येक तालुकास्तरावर कोविड रुग्णालय, विलीगीकरण कक्षसुद्धा उभारण्यात येत आहे. याकरिता चांदूर बाजार तालुक्याकरिता १०० टक्के लोकसहभागातून विलगीकरण कक्ष उभारले आहे.
लोकसहभागातून विलगीकरण कक्ष
ठळक मुद्देचांदूर बाजारात १०० खाटांची व्यवस्था : तहसीलदारांच्या संकल्पनेतून उभारणी