आयोगाचे निर्देश : महापालिकेची सार्वत्रिक निवडणूकअमरावती : बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये मतदान यंत्रावर लावण्यात येणाऱ्या विविध जागांच्या मतपत्रिका मतदारांच्या चटकन लक्षात येण्यासाठी प्रत्येक प्रभागातील प्रत्येक जागेसाठी वेगवेगळ्या रंगाच्या मतपत्रिका लावण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक जागेच्या मतपत्रिकेचा रंग निश्चित करण्यात आला आहे. अमरावतीसह राज्यातील १० महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणुका फेब्रुवारीमध्ये प्रस्तावित आहेत. १३ मे २०१६ व ३० आॅगस्ट २०१६ अन्वये महापालिकांमध्ये (बृहन्मुंबई वगळून) एक सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी बहुसदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली आहे.त्या अनुषंगाने मतपत्रिका व इतर बाबींकरिता नव्याने आदेश पारित करण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागातील ‘अ’ जागेची मतपत्रिका पांढऱ्या रंगाची असेल. ‘ब’ जागेची मतपत्रिका फिक्या गुलाबी रंगाची, ‘क’ जागेची मतपत्रिका फिका पिवळा रंग, ‘ड’ जागेची मतपत्रिका फिक्या निळ्या रंगाची असेल तर प्रत्येक प्रभागातील ‘इ’ जागेची मतपत्रिका फिक्या हिरव्या रंगाची असेल. अमरावती महापालिकेत २१ प्रभागात चार सदस्य तर एसआरपीएफ या एकमेव प्रभागात तीन सदस्य राहणार आहेत. महापालिका सदस्यपदाच्या निवडणुकीकरिता प्रत्येक प्रभागातील प्रत्येक सदस्यपदाच्या जागेला प्रभागाच्या क्रमांकासोबत यथास्थिती अ, ब, क, ड किंवा इ अशा रितीने क्रमांक देण्यात येईल. उदा. प्रभाग क्र. ९ मध्ये ३ जागा असतील तर त्या प्रभागातील जागांना ९ अ, ९ ब आणि ९ क असे संबोधण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)स्वतंत्र अनामत रक्कमनामनिर्देशनपत्र सादर करणे - महानगरपालिका सदस्यपदाच्या प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र अनामत रक्कम भरणे आवश्यक राहील. एका जागेसाठी एका व्यक्तीकडून जास्तीत जास्त चार नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येतील. एकाच जागेसाठी नामनिर्देशनपत्र स्वीकारताना अनामत रक्कम एकदाच स्वीकारण्यात येईल.-तर पहिले नामांकन वैधबहुसदस्यीय प्रभाग पद्धतीत एक उमेदवार एका प्रभागातील एकाच जागेवर निवडणूक लढवू शकेल. तथापि अन्य प्रभागातील जागेवर त्या उमेदवाराने निवडणूक लढविण्यास बंदी असणार नाही. एका उमेदवाराने एकाच प्रभागातील एकापेक्षा अधिक जागांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल केल्यास छाननीच्या वेळी कोणत्या जागेची निवडणूक लढवायची आहे याविषयी उमेदवाराची लेखी इच्छा विचारात घेण्यात यावी. उमेदवाराने अशी इच्छा व्यक्त न केल्यास प्रथमत: प्राप्त झालेले वैध नामनिर्देशनपत्र विचारात घेतले जाईल.
प्रभागातील प्रत्येक जागेसाठी वेगळी मतपत्रिका
By admin | Updated: January 7, 2017 00:16 IST