शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना संपर्क अभियनातून जाणल्या व्यथा

By admin | Updated: May 15, 2017 00:17 IST

विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेने संपर्क अभियान राबविले आहे.

मुंबई आमदारांची वारी : उद्धव ठाकरेंना आज शेतकरी प्रश्नांचा अहवाल होणार सादरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विदर्भातील शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी शिवसेनेने संपर्क अभियान राबविले आहे. त्यानुसार रविवारी मुंबईचे आ. संजय पोतनीस यांच्या नेतृत्वातील चमुने अमरावती, बडनेरा मतदार संघातील शेतकऱ्यांच्या भेटी घेवून त्यांच्याकडून समस्या जाणून घेतल्या.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसोबत थेट संपर्क साधण्यासाठी शिवसेना संपर्क अभियानाला प्रारंभ केला आहे. या अभियानाचा अकोला येथे सोमवारी १५ मे रोजी समारोप होणार आहे. त्यानुसार विदर्भात शेतकऱ्यांचे प्रश्न, समस्या जाणून घेण्यासाठी गठित सेना आमदारांकडे विविध विधानसभा मतदार संघांची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आ. राजू पोतनीस यांनी बडनेरा मतदार संघातील भातकुली, अंजनगाव बारी आदी गावांना भेटी देवून शेतकऱ्यांसोबत संवाद साधला. शेतकऱ्यांचे प्रश्न, कर्जपुरवठा, बँकांचे धोरण, थकबाकी, पीक परिस्थिती, गुरांसाठी चारा, मुला-मुलींच्या शिक्षणाची परिस्थिती, कौटुंबिक समस्या आदींवर सेना आमदारांनी शेतकऱ्यांशी संवाद साधताना भर दिला. शेतकऱ्यांना राज्य शासनाच्या धोरणाबाबत काय वाटते, हे सेना आमदार पोतनीस उद्धव ठाकरे यांना अहवाल रुपात सादर करतील. गत दोन दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सेना नेते, आमदारांची चमू विदर्भाच्या दौऱ्यावर आहे. सेनेचे नेते गावखेड्यात पोहचून शेतकऱ्यांशी संवाद साधताना सेनेबद्दल त्यांची मानसिकता तपासून पाहत आहेत. दरम्यान आ. पोतनीस यांनी अंजनगाव बारी, भातकुली आदी भागाचा दौरा आटोपून येथील शासकीय विश्रामभवनात स्थानिक निवडक सेना नेते, पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन शिवसेना संपर्क अभियानाची भूमिका मांडली. यावेळी मुंबईचे नगरसेवक राजू पेडणीकर, अरविंद भोसले यांच्यासह महानगर प्रमुख सुनील खराटे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रशांत वानखडे, वर्षा भोयर, मनीषा टेंभरे, वर्षा खारोडे, पराग गुडधे, ललित झंझाड, प्रवीण हरमकर, राजेंद्र तायडे आदी उपस्थित होते. दरम्यान, एक चमु मोर्शी, वरुड तर धामणगाव, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शेतकऱ्यांच्या भेटीसाठी दाखल झाली होती.