शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक जिल्ह्यात केंद्रीय पथक पाठवा, खासदार नवनीत राणा यांची नरेंद्र मोदींकडे विनंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 22:04 IST

राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत कोरोना संकटामुळे स्थिती बिकट आहे. याचे वास्तव चित्र समोर येण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्रीय पथक पाठविण्याची विनंती खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली.

ठळक मुद्देपंतप्रधानांनी केलेल्या कॉलवर मागणी

अमरावती : राज्यातील बहुतेक जिल्ह्यांत कोरोना संकटामुळे स्थिती बिकट आहे. याचे वास्तव चित्र समोर येण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्रीय पथक पाठविण्याची विनंती खासदार नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. शनिवारी रात्री सव्वादहा वाजता पंतप्रधान यांनी खासदारांना फोन करून कोरोना संबंधित जिल्ह्याची माहिती जाणून घेतली. यावेळी राणा यांच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन पंतप्रधानांनी दिले.शासनाने डॉक्टर, नर्स आदींना ५० लाखांचा सुरक्षा विमा दिला, त्याच धर्तीवर पोलीस, सफाई कर्मचारी, माध्यम प्रतिनिधी यांनाही सुरक्षा विम्याचा लाभ द्यावा, तसेच लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध राज्यांतील नागरिक विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. त्यांना ये-जा करण्यासाठी परवानगी द्यावी आदी मागण्या खासदार राणा यांनी पंतप्रधानांकडे केल्या. अमरावती जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढती आहे. जिल्हा आता आॅरेंज झोनमधून रेड झोनमध्ये परावर्तीत होण्याच्या स्थितीत असल्याविषयीची माहिती खासदारांनी दिली.राणा परिवाराद्वारा गोरगरिबांना अन्नधान्य वाटप करण्यात येत असल्याबाबत माहिती त्यांनी दिली असता, या उपक्रमाचे पंतप्रधानांनी स्वागत केले. तसेच सोशल डिस्टन्सिंग राखून हा उपक्रम सुरू ठेवावा, असा सल्ला राणा यांना दिला. कोरोनाच्या संकटावर लॉकडाऊन व सामाजिक अंतर हाच उपाय असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. नवनीत राणा यांनी पंतप्रधानांना केलेल्या ट्विटची आठवण करून दिली असता, सदर ट्विट वाचल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री सव्वादहाच्या सुमारास फोन केला. कोरोनासंबंधी  राज्यातील काही माहिती त्यांनी जाणून घेतली. पंतप्रधानांच्या फोनमुळे उत्साह द्विगुणित झाला.- नवनीत राणा,खासदार, अमरावती

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसnavneet kaur ranaनवनीत कौर राणा