शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘सिनेट’ निवडणूक मतदानात अव्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2017 22:48 IST

येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणुकीसाठी रविवारी घेण्यात आलेली मतदान प्रक्रिया अव्यस्थेत पार पडली.

ठळक मुद्देउमेदवारांसह मतदारांचा आरोप : आठ हजार मतदारांचे दोन हॉलमध्ये मतदान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अधिसभा (सिनेट) निवडणुकीसाठी रविवारी घेण्यात आलेली मतदान प्रक्रिया अव्यस्थेत पार पडली. उमेदवारांसह मतदारांचा दबाव वाढल्याने विद्यापीठ प्रशासनाने त्वरेने एकऐवजी दोन हॉलमध्ये मतदान घेतले. परंतु मतदानासाठी लांबच लांब रांगा हे सायंकाळपर्यंत चित्र कायम होते.स्थानिक श्री. शिवाजी शारीरिक शिक्षण महाविद्यालयात पदवीधर, प्राचार्य, अध्यापक, महाविद्यालयीन व्यवस्थापन व विद्यापीठ अध्यापक प्रतिनिधी निवडीसाठी मतदान घेण्यात आले. सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदविला. मात्र, सुमारे आठ हजार मतदारसंख्या असताना विद्यापीठ प्रशासनाने मतदानासाठी एकच हॉलची व्यवस्था केली होती. त्यामुळे मतदानासाठी अर्धा किमीपर्यंत रांग लागलेली असल्याचे दिसून आले. दोन ते तीन तास रांगेत उभे राहूनही मतदारांना मतदान करता येत नसल्याने संतप्त होत पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संजय बनारसे यांनी मतदान प्रक्रियेसाठीच्या अव्यवस्थेविरुद्ध आक्षेप घेतला. दरम्यान मतदानासाठी एकच हॉलची व्यवस्था असल्याने नुटा, शिक्षण मंच आणि प्राचार्य फोरमच्याही उमेदवारांनी मतदारांना होत असलेल्या त्रासाबाबत अवगत केले. अखेर विद्यापीठ प्रशासनाने दुपारी १२ वाजेनंतर मतदानासाठी एकाऐवजी दुसºया हॉलमध्येही व्यवस्था केली. मात्र, एका मतदारांना १० मतपत्रिकेवर पसंती क्रमांक लिहायचे असल्याने मतदान प्रक्रियेला विलंब लागला. तसेच मतदाराला प्रत्येक मतपत्रिकेवर स्वाक्षरी देण्याची सक्ती असल्याने हे सुद्धा विलंबाचे कारण ठरले, असे निवडणूक विभागाने स्पष्ट केले आहे. मात्र, सिनेट निवडणूक मतदानासाठी लांब रांगा ही स्थिती सायंकाळपर्यंत कायम होती. अमरावती विभागातंर्गत पाचही जिल्ह्यांसाठी सिनेट निवडणूक मतदान प्रक्रिया पार पडली. यात पदविधर प्रतिनिधीसाठी १०, प्राचार्य ९, अध्यापक प्रतिनिधी १०, व्यवस्थापन प्रतिनिधी ६, तर विद्यापीठ अध्यापक प्रतिनिधी ३ असे एकूण ३८ सदस्य निवडीसाठी मतदान घेण्यात आले.चार वाजता दिल्यात मतदानाच्या पासेससिनेट निवडणुकीसाठी सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदानाचा अवधी ठरविण्यात आला होता. मात्र, दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान केंद्राच्या आत प्रवेश करणाºया मतदारांना निवडणूक विभागाने मतदानासाठी नव्याने पासेस जारी केल्यात. त्यानंतर संबंधित मतदारांचे मतदान सायंकाळी ५ वाजता पूर्णत्वास आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अजय देशमुख यांनी दिली.मतमोजणी मंगळवारीसिनेट निवडणूक मतमोजणी मंगळवार १७ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून सुरु होईल. विद्यापीठ अंतर्गत पाचही जिल्ह्यातील मतपेट्या रविवारी उशिरा रात्रीपर्यत आणल्या जातील. त्यानंतर मंगळवारी मतमोजणीस प्रारंभ होऊन उशिरा रात्रीनंतर सिनेट निवडणुकीचे निकाल हाती येतील, असा अंदाज निवडणूक विभागाने वर्तविला आहे.मतपत्रिकेवर मतदारांची पहिल्यांदाच स्वाक्षरी घेण्यात आली. एकाचवेळी सर्वांना मतदान करणे शक्य नव्हते. काही मतदारांना ४६ मतपत्रिकेवर स्वाक्षरी करावी लागली. मतदारांच्या अधिकारात प्रशासन हस्तक्षेप करू शकत नाही.- अजय देशमुख, निवडणूक निर्णय अधिकारीलोकशाहीत मतदानापासून वंचित ठेवणे हे कायद्याने गुन्हा आहे. हा प्रकार जाणीवपूर्वक तर केला नाही याबाबत चौकशी करुन संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी.विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत पहिल्यांदाच असा प्रकार घडला.- सत्तेश्वर मोरे, सहसचिव, नुटा