शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

मरणाचे भय दाखवून 'न्युट्रिशन शेक' विक्री

By admin | Updated: April 8, 2016 00:06 IST

स्थळ शिवटेकडी. वार गुरुवार. वेळ सकाळी ७.३०. वजन मोजण्याच्या यंत्रासमान दिसणारे उपकरण घेऊन काही इसम शिवटेकडीच्या पायथ्याशी दाखल होतात.

हेल्थ क्लब : जिल्हाभरात सुळसुळाट, तपासणी रस्त्यांवरहीअमरावती : स्थळ शिवटेकडी. वार गुरुवार. वेळ सकाळी ७.३०. वजन मोजण्याच्या यंत्रासमान दिसणारे उपकरण घेऊन काही इसम शिवटेकडीच्या पायथ्याशी दाखल होतात. ये-जा करणाऱ्यांना त्या यंत्रावर उभे राहण्यास सांगून क्षणात 'बॉडी फॅट स्कॅनिंग' रिपोर्ट हाती ठेवतात. शरीर कमालीच्या 'डेंजर झोन'मध्ये गेल्याची धक्कादायक माहिती देतात. हार्ट अटॅक, स्ट्रोक्सच्या दिशेने होणारी ही वाटचाल असल्याचे खुणावतात आणि मग सुरू होतो तो भ्यायलेल्यांना लुटण्याचा गोरखधंदा. विदेशी कंपनीच्या हर्बल उत्पादनांचा वापर करून 'न्युट्रिशन शेक' विकणारे 'हेल्थ क्लब' शहरातील गल्लीबोळात भूछत्राप्रमाणे उगवले आहेत. ग्रामीण भागातही या 'हेल्थ क्लब'चे जाळे पसरू लागले आहे. असल्या क्लबचे सदस्य झटपट श्रीमंतीच्या नादात चालत्या माणसांनाही घाबरवू लागले आहेत. क्लब स्थापनेमागील मुख्य उद्देशही आकर्षक मिळकत प्राप्त करणे हाच आहे. लोकांची व्यस्त जीवनशैली आणि त्यामुळे निर्माण होणारा लठ्ठपणा, रक्तचाप, हृदयविकार, मधुमेह, पचनसमस्या आदी मुद्यांचा वापर करून ही मंडळी नागरिकांमध्ये आरोग्याप्रती भय निर्माण करते. 'तुमच्या कुणी ओळखीची व्यक्ती चालता बोलता अचानक दगावल्याचे लक्षात असेल', अशी व्यवसायपूरक आठवण ते करून देताना, शरीर बाहेरून चांगले दिसत असले तरी हृदय, लिव्हर, किडनी, रक्तवाहिन्या यावर फॅट्स वाढल्यामुळे असा अकाली मृत्यू ओढवतो. तुमच्या शरीरात वाढलेल्या फॅट्सचे प्रमाण धोकादायक आहेत. ज्यांच्याकडे उपाय नव्हता ते गेलेत; पण तुम्ही भाग्यवंत आहात. आमच्या 'हेल्थ क्लब'ला या. शेक घ्या. तीन महिन्यांत वजन घटेल. तुमचा पुनर्जन्म होईल, अशी भुरळ या क्लब सदस्यांकडून घातली जाते. सदस्य क्लबमध्ये यावेत यासाठी फोनद्वारे पाठपुरावा केला जातो. सहसा ही जबाबदारी महिलांना दिली जाते. क्लबला गेलात की, एकवेळच्या शेकसाठी १८० रुपये आकारले जातात. २० दिवस शेक घेणे आवश्यकच असल्याचे सांगितले जाते. कुपन आधीच खरेदी करण्यासाठी कमालीचा तगादा लावला जातो. लठ्ठ व्यक्तिला दोनवेळा शेक घ्यायला सांगितले जाते. एका शेकमागे साधारणत: १०० रुपयांचा नफा क्लबसदस्य कमवितात. दिवसभरात २० सदस्य आलेत तर दोन हजार रुपये आणि ५० सदस्य आलेत तर पाच हजार रुपयांची कमाई होते. सकाळी तीन आणि सायंकाळी दोन तास वेळ दिला की, अशी हजारो रुपयांची कमाई दिवसाला केली जाते. ही कमाई लोकांच्या मृत्यूभयावर आधारित असल्याने आहारशास्त्र वा वैद्यकशास्त्राच्या अधिकृत शिक्षणाशिवायदेखील सामान्यजनांचे खिसे रोज रिते केले जातात.